भाजपा सर्व सामान्याचा पक्ष – मोनिकाताई राजळे

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
सर्वसामान्य नागरिक व शेतकरी डोळ्यासमोर ठेवून अंत्योदयाचा मंत्र घेऊन चालणारे केंद्रातील भाजपा व महायुती शासनाने विविध कल्याणकारी योजना राबवल्या आहेत, या लोककल्याणकारी योजना सर्वसामान्या पर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपा कार्यकर्ता बुथ प्रमुख मतदारसंघातील ३६५ बूथवर अहोरात्र कार्य करत आहे.
भाजपा हा सर्वसामान्यांचा पक्ष असून प्रथम राष्ट्र हा उद्देश ठेवून सबका साथ, सबका विकास या ध्येयाने गरीब कल्याण, महिला सशक्तिकरण, सशक्त समृद्ध शेतकरी, आरोग्य धनसंपदा, पायाभूत सुविधा विकास करणे या उद्देशाने काम करत असल्याचे आमदार मोनिकाताई राजळे यांनी सांगितले
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मौजे आखेगाव – कळसपिंपरी – तोंडोली फाटा या चार कोटी रुपये किमतीच्या साडेपाच किलोमीटर रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी पागोरी पिंपळगाव ते सोमठाणे नलवडे या सहा कोटी ३७ लाख रुपये किमतीच्या साडेआठ किलोमीटर रस्त्याचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ताराभाऊ लोढे, बापूसाहेब भोसले, बापूसाहेब पाटेकर, आशुतोष डहाळे, बाबासाहेब किलबिले , आखेगावचे सरपंच शंकरराव काटे, भगवानराव काटे, ठाकूर निमगाव चे सरपंच संभाजी कातकडे, राक्षीचे सरपंच भक्तराज कातकडे, हरिभाऊ झुंबड मामा, कृष्णा झुंबड, डॉ. गणेश धावणे, जवरे सर, नवनाथ फासाटे, डॉ.मल्हारी लवांडे, डॉक्टर सिंदाडे, पोपटराव सातपुते, बापूराव काटे काका, काकासाहेब खर्चन, अशोक काकडे, शिवाजीराव काटे, झिंजूर्के गुरुजी, लक्ष्मण गवळी, आप्पासाहेब बोडखे, बालूभाऊ झिरपे, सचिन खंडागळे मुख्यमंत्री ग्रामसडक चे शाखा अभियंता पवार साहेब, ठेकेदार बाळासाहेब मुरदारे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार मोनिकाताई राजळे म्हणाल्या आखेगाव व परिसरातील नऊ गावांमध्ये पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणावर आहे, जिल्ह्याचे पालकमंत्री व खासदार यांच्या समवेत संबंधित अधिकारी यांची बैठक लावून ताजनापूर उपसा सिंचन योजनेतून या गावातील शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल, प्रश्न कोणीही मांडला असला तरी लोकप्रतिनिधी म्हणून प्रश्न मार्गी लावणे ही आमची जबाबदारी आहे, या योजनेसाठी राज्याबरोबर केंद्राचा ही निधी आवश्यक असून करिता पालकमंत्री खासदार यांच्या समवेत लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार आहे.
असंख्य भारतीयांचे स्वप्न असलेल्या राम मंदिराचा प्रश्न केंद्रातील मोदी शासनाच्या माध्यमातून पूर्णत्वाला आला, या सोहळ्यासाठी माननीय पंतप्रधानाच्या आमंत्रणाद्वारे आपल्या तालुक्याचे भूषण असलेल्या ह भ प राम महाराज झिंजुर्के हे या भव्य दिव्य सोहळ्यासाठी उपस्थित राहिले याचा आपल्याला सार्थ अभिमान असल्याची भावना यावेळी आमदार मोनिकाताई राजळे यांनी यावेळी व्यक्त केली, कार्यक्रमाचे प्रास्ताविक आखेगावचे माजी सरपंच बाबासाहेब गोरडे यांनी केले, तर आभार संभाजीराव काटे यांनी मांडले.