ग्रामसेवक आणि ग्रामस्थ वाद टोकाला! कोतुळ गावात कडकडीत बंद! निषेध सभा ,ग्रामपंचायतला टाळे ठोकले

कोतुळ प्रतिनिधी
ग्रामसेवकाने पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केल्याने ग्रामसेवक आणि गावातील ग्रामस्थ यांचा वाद आता टोकाला गेला आहे. ग्रामसेवकाच्या मनमानीविरुद्ध ग्रामस्थांनी आज कडकडीत बंद पाळा निषेध सभा घेत ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले
कोतुळ ग्रामपंचायत चे ग्रामविकास अधिकारी मार्तंड वावीकर यांच्या मनमानी कारभारा विरुद्ध कोतुळ ग्रामस्थांनी आज गुरुवारी गावात बंद पाळला.

ना हरकत व काही दाखले देण्याचे कारणावरून अरेरावी शिवीगाळ करून, कट मारून उडवून देण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सीताराम काशिनाथ देशमुख, तसेच ग्रामपंचायत माजी सदष्य शंकर रामदास घोलप, धनंजय रमेश देशमुख, सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी बाळासाहेब जयराम देशमुख (रा. कोतूळ) यांच्या विरोधात ग्रामविकास अधिकारी श्री वावीकर यांनी सोमवारी अकोले पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
सोमवारी कोतुळ ग्रामपंचायतीमध्ये काम करत असताना दुपारी चार वाजल्याच्या सुमारास कोतूळ गावातील शंकर रामदास
घोलप, धनंजय रमेश देशमुख हे गौण खनिजा बाबतचा ना हरकत दाखला घेण्याकरिता ग्रामपंचा यत मध्ये आले व आम्हाला लगेच ना हरकत दाखला द्या, असे बोलले. म्हणून मी त्यांना सांगितले की, माझी उद्या मिटिंग आहे. तुम्ही दोन दिवसांनी जागेचे उतारे घेऊन या व ना हरकत दाखला घेऊन जा..असे म्हटले असता त्यांनी माझ्याशी अरेरावीची भाषा करून, तू आमच्यासाठी नोकर आहेस. तू ऑफिसला येऊ नको, असे म्हणून मला शिवीगाळ करून, तू येथे कसा राहतो हेच पाहतो, असा दम दिला. त्यांनी फोन करून लगेच बाळासाहेब जयराम देशमुख, सीताराम काशिनाथ देशमुख यांना बोलावून घेतले व त्यांनी मला कॅबिनमध्ये बोलावले. तुम्ही दाखला का देत नाही असे म्हणून त्यांनीही शिवीगाळ करून मला कट मारून उडवून देऊ अशी धमकी दिली यावरून

शंकर रामदास घोलप, धनंजय रमेश देशमुख, बाळासाहेब जयराम देशमुख, सीताराम काशिनाथ देशमुख यांच्याविरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून भा.द.वि. कलम १८६, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणावरून गुरुवारी गावात बंद चे आवाहन करण्यात आले होते सर्व व्यावसायिकांनी कडकडीत बंद पाळला
त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय समोर निषेध सभा घेण्यात आली या सभेच्या अध्यक्षस्थानी अगस्तीचे माजी संचालक सयाजीराव देशमुख होते या सभेत ग्रामसेवकाच्या मनमानी कारभाराविषयी अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली खोट्या ग्रामसभा दाखवून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न ग्रामसेवक करतच आहे आपली पाप झाकण्यासाठी ग्रामसेवक कायद्याचा गैरवापर करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सिताराम देशमुख सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी बी जे देशमुख ,भाऊसाहेब देशमुख ग्रामपंचायत सदस्य सागर घोलप सचिन गीते, राजू पाटील देशमुख बाळासाहेब देशमुख अमोल कोते, नरेश साळवे ,अभिजीत देशमुख ,सोमदास पवार यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केला
आपरिपकव लोकांच्या ताब्यात ग्रामपंचयत चा कारभार गेला 15 ते 16 खोट्या सभा कागदोपत्री दाखविल्या जलजीवन पाणी योजना मध्ये 50 लाखाची टक्केवारी कोणी मागितली याची क्लिप योग्य वेळी दाखवु झालेल्या सभांचे अडीच महिने ग्रामसेवक प्रोसेडींग लिहित नाही मुख्यालयी न राहता ग्रामसेवक सिन्नर हुन महिन्यातून कधी तरी गावात येतो दाखले वेळेत देत नाही उलट कायद्याचा गैर वापर करून जाब विचारणाऱ्यांवर गुन्हे दाखल करतो असा आरोप बी जे देशमुख यांनी केला या सर्व घटनेमागे आमदार किरण लहामटे यांचा आशीर्वाद असल्याचा आरोप बी जे देशमुख सीताराम देशमुख यांनी केला