लक्ष्मण काशीद सामाजिक गौरव पुरस्काराने सन्मानित

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील रहिवासी लक्ष्मण विठ्ठल काशीद यांना शिवजयंती निमित्त स्वर्गीय किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था निमगाव वाघा अहमदनगर यांच्यावतीने दिला जाणारा सामाजिक कार्य गौरव पुरस्कार २०२४ देऊन गौरवण्यात आले.ते करत असलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, अहमदनगर तालुक्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते,उद्योगपती तथा जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, निवृत्त पोलीस अधिकारी सुभाष सोनवणे, नाना डोंगरे, यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या शिवजयंती उत्सवात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा ही सन्मान करण्यात आला. काशीद यांचे शेवगाव -पाथर्डीचे आमदार मोनिकाताई राजळे, सुनील रासने,जिल्हा उपाध्यक्ष वाय डी कोल्हे, युवा नेते संदिप खरड, उमेश भालसिंग, महेश उर्फ रिंकू फलके, कल्याण महाराज पवार, आप्पासाहेब सुकाशे, कल्याण जगदाळे, आसाराम नऱ्हे, शरद थोटे, सचिन खंडागळे, अशोक दळवी, आदिल पठाण, संतोष आढाव, यांच्यासह आदींनी अभिनंदन केले आहे.
बाल शाहिर ओवी काळेचे कौतुक
स्वर्गीय किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेमार्फत शिवजयंती उत्सव निमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान व चौथे राज्यस्तरीय काव्य संमेलनाचे आयोजन यानिमित्ताने आयोजित केले गेले होते. याप्रसंगी बाल शाहीर ओवी काळे हिने गायलेल्या छत्रपती शिवरायांच्या पोवाडाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी उपस्थित मान्यवरांसह सर्वांनीच ओवी काळे यांचे कौतुक केले.