मराठा आंदोलनातील गुन्ह्यांबाबत भायगावात विशेष ग्रामसभा

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव -नेवासा रोड वरील भातकुडगाव फाटा चौफुल्यावर गेल्या काही दिवसापूर्वी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रीतसर परवानगी घेऊन शांततेत भातकुडगाव फाटा परिसरातील सकल मराठा समाजाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आला होता. या आंदोलनामध्ये भायगावचे युवा नेते राजेंद्र आढाव, जोहरापूरचे माजी सरपंच अशोक देवढे,शेतकरी बचाव जन आंदोलनाचे एकनाथ काळे प्रहारचे तालुकाध्यक्ष रामजी शिदोरे, प्रहारचे जिल्ह्याचे नेते तुकाराम शिंगटे, कामधेनु पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब काळे, राजेश लोंढे, शेतकरी संघटनेचे मच्छिंद्र आर्ले यांच्यासह आदिवर शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा तालुक्यातील सकल मराठा समाजामध्ये नाराजीचा सुर आहे.भायगाव ग्रामपंचायतच्या वतीने लोकनियुक्त सरपंच मनीषाताई आढाव यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा बोलवण्यात आली होती. यावेळी भातकुडगाव फाटा चौफुल्यावर झालेल्या रस्ता रोको मध्ये भायगावचे युवा नेते राजेंद्र आढाव पाटील यांच्यासह आदि वरील दाखल गुन्हे त्वरित मागे घ्यावे. अशी मागणी भायगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली.यावेळी ॲड लक्ष्मणराव लांडे पाटील यांनी भ्रमणध्वनी वरून ग्रामसभेस संबोधित केले.रामजी शिदोरे, दगडू दुकळे, विठ्ठल रमेश आढाव,अशोक देवढे, डॉ.परवेज सय्यद, राहुल बेडके, बाळासाहेब काळे, पत्रकार शहाराम आगळे यांनी आपले मनोगत व्यक्त केलें. यावेळी विकास संस्थेचे माजी चेअरमन भगवान आढाव, भायगावचे माजी सरपंच अशोक दुकळे,रामनाथ आढाव, डॉ विजय खेडकर, सर्जेराव दुकळे, शिवाजी लांडे, विष्णू घाडगे, काकासाहेब विखे, बापूराव दुकळे,गंगाराम नेव्हल,रंगनाथ आढाव,विजय दुकळे,संदीप लांडे, बाळासाहेब लोढे,एकनाथ लांडे,कानिफनाथ घाडगे, महेश दुकळे, कडूबाळ आढाव, सुदाम खंडागळे,दत्तात्रय बडे, यांच्यासह आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.आयोजित ग्रामसभेचे प्रास्ताविक विठ्ठल प्रल्हाद आढाव यांनी केले तर आभार अविनाश महाराज लोखंडे यांनी मांडले.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा संघर्ष योद्धा क्रांतीसुर्य मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भातकुडगाव फाटा येथील चौफुल्या वरील रस्ता रोको मध्ये सहभागी असल्यामुळे माझ्यावर झालेला गुन्हा हा समाजकारणातील गुन्हा आहे.गावच्या पाठिंबामुळेच मला समाजकारणासाठी बळ मिळते. ग्रामस्थांनी दाखवलेल्या या एकीच्या बळाचा मला अभिमान आहे.राजेंद्र आढाव पाटील
युवा नेते भायगाव
मराठा आरक्षणातील लढ्यासाठी शेवगाव तालुक्यातील झालेल्या गुन्ह्यासाठी मी एकही रुपये न घेता या मराठा तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील एक भायगावकर नागरिक म्हणून भायगावकरांनी विशेष सभा घेऊन राजेंद्र आढाव पाटील यांच्या पाठीशी बळ उभे केले याचाही आनंद आहे.
-ॲड लक्ष्मणराव लांडे पाटील
विधी तज्ञ
मराठा आरक्षणासाठी भातकुडगाव फाटा येथे शांततेत झालेल्या रस्ता रोको प्रसंगी मराठा आंदोलनकर्त्यांवर दाखल झालेला गुन्हा मागे घ्यावा खासदार व आमदार दोन्हीही मराठा समाजातील असताना मराठा समाजावर झालेला अन्याय जनता विसरणार नाही. यासाठी आपण लवकरच गावोगावी बैठका घेऊन सर्वानुमती पुढील निर्णय घेऊ रामजी शिदोरे
प्रहार तालुकाध्यक्ष