ओबीसी मधून आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही… मनोज जरांगे पाटील

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळाल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही असे प्रतिपादन
मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी पारनेर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित महासंवाद मेळावा प्रसंगी केले.ते पारनेर शहरातील ऐतिहासिक बाजारतळावर आयोजित कार्यक्रमात बोलत होते. पारनेर शहरात जरांगे पाटील यांचे आगमन होताच जेसीपी मधून त्यांच्या वर पुष्पंचा वर्षाव करण्यात आला. प्रथमतः जरांगे पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर स्मारक येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्धाकृती पुतळ्यासमोर नतमस्तक होत पुष्पहार अर्पण केला. तद्नंतर हनुमान मंदिर लगत असलेल्या दर्ग्याला मुस्लीम बांधव यांच्यावतीने चादर चढविण्यात आली. तर वेशी जवळ असलेल्या महत्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून पुष्पहार घालण्यात आला. या नंतर जरागे पाटील एतेहसिक बाजारतळ येथे उपास्थित मराठा समाजाला संबोधित करण्यासाठीं प्रस्थान केले.
यावेळी जरांगे पाटील उपस्थित मराठा समाजाला संबोधित करताना म्हणाले मराठा समाजाची शेवटची आरक्षण साठी लढाई आहे.मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळाल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही.आमच्या लेकरांचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही कोणतीही किंमत मोजायला तयार आहे.सरकारने आम्हाला कायद्याने खेटायचे ठरवले आहे.आम्ही मराठा बांधवही आपणास कायद्यानेच खेटणार आहोत.प्रत्येक जिल्ह्यातून हजारो निवडणूक फॉर्म भरून आमच्या आरक्षण विरोधी भूमिका घेणाऱ्याना सरकारला जागा दाखवणार आहोत.आम्ही आमच्या मराठा जातीच्या आमदार खासदार यांना मोठे केले पण त्यांनी जातीलाच सोडून दिले आहे.मराठा समाजाचा जिवावर मोठे झाले तेच राजकारणी मंत्री आता मराठ्यांचे विरोधात बोलत आहेत.आता आमचा मराठा समाजही मराठ्यांची ताकत कीती आहे ते दाखून देणार आहे.यावेळी मराठा समाजाने एकजुटीने संघर्ष करावयाचा आहे.जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तो पर्यंत मी एक इंचही मागे हटणार नाही.