उदयोजक डावरे यांचेकडून सर्वोदय विदयालयास इंटरॅक्टिव्ह बोर्डची देणंगी.!

अकोले/प्रतिनिधि-
विदयार्थ्यांमध्ये नवनवीन माहिती तंत्रज्ञान विकसित व्हावे,या उद्देशाने प्रोफाईव्ह इंजिनिअरिंग प्राव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीचे मालक व अकोले तालुक्यातील निंब्रळ गावचे भूमिपुत्र उदयोजक माणिकराव डावरे यांनी राजूर येथील सत्यनिकेतन संस्थेच्या गुरूवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्यामंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाला दोन इंटरॅक्टिव्ह डिस्प्ले पॅनल बोर्ड देणगी रुपाने दिले.
टप्प्याटप्प्याने आपल्या विद्यालयातील आणखी काही वर्ग स्मार्ट क्लासरूम मध्ये रुपांतरीत करण्याचा त्यांचा मानस आहे. हे उपकरण प्राप्त करण्यासाठी दिपक बुऱ्हाडे यांचे बहुमोल सहकार्य लाभले
या स्तुत्य उपक्रमामुळे उदयोजक माणिकराव डावरे यांचे सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष मनोहरराव देशमुख,सचिव टि.एन.कानवडे, कोषाध्यक्ष विवेक मदन,संचालक मिलिंद उमराणी,विजय पवार, अशोक मिस्त्री,प्रकाश टाकळकर,एस.टी.येलमामे,विलास पाबळकर,विभागीय अधिकारी प्रकाश महाले,माजी प्राचार्य लहानू पर्बत,मनोहर लेंडे, प्राचार्य भाऊसाहेब बनकर,उपप्राचार्य अण्णासाहेब धतुरे,पर्यवेक्षक सदाशिव गिरी,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी,पालक आदींनी अभिनंदन केले.
विदयार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी निश्चितच या संचाचा फायदा होणार आहे.या माध्यमातून विदयार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे शिक्षण देणेकरीता विदयालयातील शिक्षक या संसाधनांचा पुरेपुर वापर करतील. विदयालयाच्या शैक्षणिक व भौतिक सुविधांच्या उपलब्धतेत आपल्या सारख्या देणगीदारांचे बहुमुल्य योगदान असून देणगीदारांच्या सहकार्यामुळेच विद्यालयाची वाटचाल सुरू आहे.असाच जिव्हाळा यापुढील काळातही वृद्धींगत व्हावा.– प्राचार्य भाऊसाहेब बनकर