संगमनेरात महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी!

संगमनेर प्रतिनिधी
संगमनेर शहरातील बस स्टैंड समोर परिसरात लिंगायत जंगम समाज्याच्या वतीने १२ व्या शतकातील थोर समाजसुधारक, क्रांतिकारी संत, तत्त्वज्ञ,वीरशैव लिंगायत समाज संस्थापक महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करण्यात आली.
शुक्रवार (दि.१०) रोज़ी अक्षय तृतीयेच्या दिवशी संपूर्ण देशभरात वीरशैव लिंगायत समाज संस्थापक महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी केली जाते. बाराव्या शतकात कर्नाटकातील विज़ापुर जिल्ह्यातील इंगळेश्वर – बागेवाडी या गावात संत बसवेश्वर यांचा जन्म झाला होता तो दिवस म्हणजे वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय तृतीया. त्यामुळे अक्षय तृतीयेला बसव जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
या कार्यक्रमाला सुभाष जंगम,वसंत बैचे,ज्ञानेश्वर कथले,हेमंत तांदळे,विकास वनपत्रे,मंगेश सालपे,प्रभाकर तोरकडी,संजय कबाडे,संतोष तक्ते,चंद्रकांत जंगम,देविदास वाळेकर,सतीश महापरळे,विश्वनाथ स्वामी,पूनम तांदळे,राजश्री कथले,दिलीप कबाडे,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघचालक सुभाषराव कोथमीरे,प्रविण कर्पे,हेमंत वालझाडे,गोपीचंद कुशवाह,शेखर ठूसे आदीसह संगमनेर शहरासह तालुक्यातील लिंगायत जंगम समाजाचे लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संगमनेर प्रमाणेच निमगांवजाळी येथे देखील ग्रामपंचायतीच्या वतीने महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी समता पथसंस्थेत देखील महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन सर्व लिंगायत जंगम समाज बांधवांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्त साधत लिंगायत जंगम समाजाच्या वतीने तसेच समता पथसंस्थेच्या वतीने संगमनेर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मंगेश सालपे यांचा सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन २०२४ मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची
जयंती साजरे करण्याबाबतचे परिपत्रक काढले असून त्यात महात्मा बसवेश्वरांची देखील जयंती साजरी करण्याचा उल्लेख असून देखील बहुतांश शासकीय कार्यालयात या शासन निर्णयाला फरताळ फासत जयंती साजरी करण्यात आली नाही नसल्याबाबत समाजाच्या वतीने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.