माका येथील शाहू महाराज विद्यालयाची श्रावणी भताने हिचे सुयश

दत्तात्रय शिंदे
माका प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील माका येथील मूळा एज्यूकेशन सोसायटीच्या,छत्रपती राजर्षी शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी कु . श्रावणी विजय भताने हिने दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत ९६.२० % गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे . तिच्या या उत्तुंग यशाबद्दल मुळा एज्यूकेशन सोसायटीचे मा उदयन दादा गडाख, डॉ. निवेदिता ताई गडाख,नेहलताई गडारव, तसेच संस्थेचे मा .विनायक देशमुख सर,मा .उत्तमराव लोंढे सर मा .तुवर सर, यांनी अभिनंदन केले तसेच तिच्या यशामध्ये माका विद्यालयाचे मुख्याध्यापक सोनवणे डी. आर सर .,पवार एन. आर .,घुले व्ही. डी, खेमनर बी. बी .,चौधर ए. एस., घोडेचोर सर, फुलमाळी आर. बी . नवथर सर, गायके सर, पुंड मामा, मदने मामा आदि सर्वांनी अथक परिश्रम घेतले. या यशाबद्दल सर्वांचे आभार माका ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले .