महिलांसाठी अग्निहोत्र प्रशिक्षण कार्यक्रम….

.
चला ‘अग्निहोत्र’ शिकूयात…!
‘
सोलापूर : सध्याच्या काळात बदलती जीवनशैली प्रत्येकाच्या आरोग्यावर खूप परिणामकारक होत आहे. मानसिक स्वास्थ्य बिघडत आहे. आजकाल प्रत्येक जण मानसिक शांतता, समाधान, तणावमुक्तीचे जीवन मिळवण्यासाठी धडपडत आहे. पूर्वांपारपासून अनेक जण ‘अग्निहोत्र’ करत आहेत. ‘अग्निहोत्र’ केल्याने मानसिक शांतता, तणावमुक्त व रोगमुक्त जीवन आणि समाधान मिळतो. तसेच उर्जा मिळून आरोग्यासाठी खूपच लाभदायक ठरतो.
रविवार, दि. २ जून रोजी कन्ना चौकातील तोगटवीर समाजाच्या चौडेश्वरी मंदिरात संध्याकाळी ४.०० वाजता येथे सुरुवात होईल. सृष्टी डांगरे या प्रशिक्षण देणार आहेत. महिलांनी येताना सोबत वही – पेन आणावेत. अग्निहोत्र करण्यासाठी लागणारे साहित्याचे माहिती देतील.
अग्निहोत्र प्रशिक्षण कार्यक्रमात जास्तीत जास्त महिलांनी सहभाग व्हावे, असे आवाहन श्री तोगटवीर समाज महिला मंडळाचे अध्यक्षा उमा पुडूर, उपाध्यक्षा सरोजनी सोमनाथ, सचिव कांतायनी पुरुड, सहसचिव सुनिता बडगंची, खजिनदार उमा बद्दल व पद्मशाली सखी संघमच्या अध्यक्षा ममता मुदगुंडी, उपाध्यक्षा जमुना इंदापूरे, सचिवा ॲड. रेखा गोटीपामूल, सहसचिवा ममता तलकोकूल, खजिनदारदर्शना सोमा, सहखजिनदार लक्ष्मी कोडम, कार्याध्यक्षा वरलक्ष्मी गोटीपामूल, कार्याध्यक्षा अंबुबाई पोतू, समन्वयिका आरती इप्पलपल्ली, समन्वयिका सुनिता क्यामा, समन्वयिका कला चन्नापट्टण, सदस्या रजनी दुस्सा, भाग्यश्री पुंजाल, लता मुदगुंडी, पल्लवी संगा, आरती बंडी आदींनी केल्या आहेत.