आजचे पंचांग व राशिभविष्य दि.२५/०६/२०२४

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- आषाढ ०४ शके १९४६
दिनांक :- २५/०६/२०२४,
वार :- भौमवासरे(मंगळवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०५:५६,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०७:०८,
शक :- १९४६
संवत्सर :- क्रोधी
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- ग्रीष्मऋतु
मास :- ज्येष्ठ
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- चतुर्थी समाप्ति २३:१२,
नक्षत्र :- श्रवण समाप्ति १४:३३,
योग :- वैधृति समाप्ति ०९:०५,
करण :- बव समाप्ति १२:१८,
चंद्र राशि :- मकर,
रविराशि – नक्षत्र :- मिथुन – आर्द्रा,
गुरुराशि :- वृषभ,
शुक्रराशि :- मिथुन,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- स. ०९नं. चांगला दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी ०३:५० ते ०५:२९ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी १०:५३ ते १२:३२ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी १२:३२ ते ०२:११ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०३:५० ते ०५:२९ पर्यंत,
❀ दिन विशेष:
अंगारक चतुर्थी (मुंबई चं.उ. २२:२८), शुक्र पश्चिम दर्शन, दग्ध २३:१२ नं., घबाड १४:३३ नं. २३:१२ प.,
————–
🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾
आजचा दिवस सुखाचा जावो मन प्रसन्न राहो!!!!!
💐🌺🌼🌹🌾🍀🌻🌷🌸
🌏 दैनिक राशीभविष्य 🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- आषाढ ०४ शके १९४६
दिनांक = २५/०६/२०२४
वार = भौमवासरे(मंगळवार)
मेष
आजचा दिवस आपल्यासाठी चांगला असेल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. सढळ हाताने मदत कराल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. आवडते पदार्थ खाल.
वृषभ
वाणी सौम्य ठेवून वागाल. मैत्रीपूर्ण संबंध जपावेत. कामातून मान-प्रतिष्ठा लाभेल. सर्वांशी गोडीगुलाबीने वागाल. स्थावर मालमत्तेच्या व्यवहारातून लाभ संभवतो.
मिथुन
स्थावरचे व्यवहार सुसह्य होतील. कागदपत्रांवर सही करतांना सावधानता बाळगावी. भागीदारीच्या कामात सक्रिय व्हाल. नवीन संबंधातून क्षणिक सुख मिळेल. स्वत: विषयक चुकीच्या कल्पना मनातून काढून टाका.
कर्क
जोडीदाराशी विसंवादाची शक्यता. तुमच्यातील अधीरता वाढेल. आपले विचार जवळच्यावर लादण्याचा प्रयत्न कराल. मनाजोगी खरेदी कराल. वरिष्ठांना खुश ठेवावे.
सिंह
घरातील सुख सोयींकडे विशेष लक्ष द्याल. आरोग्याच्या किरकोळ तक्रारी राहतील. वरिष्ठांच्या सल्ल्याने वागावे. आभ्यासू लोकांचा सहवास लाभेल. नवीन विचार जाणून घ्याल.
कन्या
फायदा साधण्याकडे विशेष लक्ष राहील. गृहसौख्याला अधिक महत्व द्यावे. मतभिन्नता दर्शवू नका. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. अपचनाचा त्रास जाणवेल.
तूळ
दूरस्थ व्यावसायिक कामात गती येईल. जवळचा प्रवास घडेल. हातातील कामात यश येईल. उष्णतेचे त्रास संभवतात. तिखट व तामसी पदार्थ खाल.
वृश्चिक
कोणतेही साहस करतांना सावधानता बाळगावी. हट्टीपणा सोडून लवचिक व्हावे लागेल. कौटुंबिक प्रश्न सतावतील. नातेवाईकांना नाराज करू नका. भागिदारीतून लाभ उठवाल.
धनू
जमिनीच्या कामात गती येईल. जोडीदाराचे कौतुक केले जाईल. व्यवहार कुशलता दाखवावी लागेल. समर्पक भावना दर्शवावी लागेल. वैचारिक दृष्टीकोन बदलून पहावा.
मकर
सहकार्यांची वेळेवर मदत मिळेल. कामात वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. तुमची भावनाशीलता प्रियजनांच्या लक्षात येईल. मनातील संभ्रम दूर सारावा. व्यावसायिक कामात अधिक वेळ द्यावा लागेल.
कुंभ
नवीन आव्हाने जाणून घ्यावीत. कामानिमित्त घरापासून दूर जावे लागू शकते. बोलण्याच्या भरात जबाबदारी उचलाल. बाग कामात मन रमेल. अनावश्यक खर्च टाळावा.
मीन
इतरांना आपले मत मान्य करायला लावाल. दिवसभर कामात व्यस्त राहाल. सारासार विचारांवर भर द्यावा. स्वतंत्र विचारांची कास धराल. काही कामे अधिक कस पाहतील.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर