पिंपळगाव खांड धरण भरण्याच्या मार्गावर, रोटेशन बंद केले!

कोतुळ प्रतिनिधी
अकोले तालुक्यात मुळा नदी पाणलोट क्षेत्रात आज दिवसभर संततधार पाऊस सुरू होता दिवसभ राच्या संततधार पावसामुळे आदिवासी भागात डोंगरदऱ्या आता ओल्या चिंब झाल्या आहेत ओढे नाले खळखळून वाहू लागले आहे भात लागवडी योग्य पाऊस सुरू झाल्याने भात पिकाच्या लागवडी आता सुरू झाल्या आहे आज पहाटेपासूनच पाणलोट क्षेत्रात पावसाने जोर धरला दिवसभर पावसाचे सातत्याने टिकून जोराच्या सरी कोसळत असल्याने आज जनजीवन विस्कळीत झाले मुळा नदीच्या प्रवाहामध्ये वाढ होत आहे
मुळा नदीचा प्रवाह हा 600 दल घ फु क्षमतेच्या पिंपळगाव खांड धरणात स्थिरावत असून पिंपळगाव खांड धरणाचा पाणीसाठा 427 दशलक्ष घनफूट झाला आहे
। धरण ओव्हर फ्लो होण्याची आशा निर्माण झाली आहे यामुळे धरणातून नदी पात्रात सुरू असलेले पीण्याचे पाण्याचे रोटेशन आज बंद करण्यात आल्याचे शाखा अभियंता श्री सूर्यवंशी यांनी सांगितले रात्री उशिरा पिंपळगाव खांड धरण ओव्हर फ्लो होऊन पाण्याचा प्रवाह मुळा धरणाकडे झेपावणार आहे
