सासऱ्या च्या अश्लील हालचालीस कंटाळून विवाहितेने दिला आत्मदहनाचा इशारा

पारनेर -जुन्नर तालुक्याच्या सरहद्दीवरील रेनवडी गावातील प्रकार
दत्ता ठुबे
पारनेर/ प्रतिनिधी
पारनेर आणि जुन्नर सिमेवर असणारे तालुक्यातील रेनवडी या गावाकडे पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याने या गावात अनेक अपप्रवृत्ती बळावताना दिसतात त्यातुनच येथे नैतिकतेचा बोजवारा उडताना दिसतो.येथील एका कुटुंबातील( वय ३५) विवाहिता आपल्या सासऱ्याच्या अश्लील हालचालीस कंटाळली यावर तिने आत्मदहनाचा इशारा देताच तिला पतीने घरातुन बाहेर काढले एक वर्षापासून ती तालुक्यातील आपल्या माहेरात राहते.
सविस्तर वृत्त असे की रेनवडी गावातील पुर्वेला कुकडी नदीच्या काठावर दिवसा निर्मुष्य होणारी ही वस्ती नदीच्या कडेला एकांतात आहे.तिचे पती नागापूर ता.जुन्नर ग्रामपंचायत कार्यालयात कारकुन म्हणून कामाला आहे सकाळी पती कामाला निघून जातात पाठोपाठ सासु देखील कामाला निघून जाते मुले शाळेत जातात मात्र सासरे हे सतत घरी असतात दुपारी निर्मनुष्य होणाऱ्या या वस्तीवर या वस्तीवर विवाहिता आणि सासरे एकटेच राहतात अशावेळेस सासऱ्याच्या असभ्य हालचाली सुरू होतात (वय ६४) व त्याच्या मनातील सुप्त इच्छा जागृत होऊन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन सतत सासऱ्याकडून होत आहे सासरे मोबाईलवर कायम अश्लिल व्हिडिओ पाहतात आणि मोबाईल स्क्रिन तिला दिसेल अशा प्रयत्नात तो नेहमी असतो मी एक संस्कारी स्त्री असुन हा सर्व बिभत्स प्रकार तिला सहन न झाल्याने तिने आपल्या पतीला हे सांगितले पती सरकारी नोकर असुन त्याने देखील याबाबत मुगगिळीची भुमिका घेतली असा आरोप विवाहितेने पोलिसांना दिलेल्या माहितीत केला आहे सुरवातीला याबाबत विवाहितेने पारनेर पोलिस ठाण्यात धाव घेतली असता पोलिसांनी तिच्या अर्जाची बोळवण केली. पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळेच हे प्रकरण विनाकारण ताणले गेले आहे अखेर विवाहितेने माध्यम प्रतिनिधीकडे मदतीची याचना केली आहे.
एक वर्षापासून हि विवाहिता नाईलाजास्तव आपल्या मुलापासून वेगळी माहेरात राहते.रेनवडीच्या रानच्या वस्तीवर सासऱ्याकडून तिच्यावर प्राणघातक हल्ला होण्याची शक्यता आहे असा आरोप विवाहितेने पारनेर पोलिसांना दिलेल्या माहितीत केला आहे.ह्या व्यक्तीला गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी असल्याची येथील ग्रामस्थ दबक्या आवाजात बोलतात याबाबत जिल्हा पोलिसांनी वरिष्ठ पातळीवरून चौकशीचे आदेश द्यावे तसेच जनसामान्य लोकांचे कैवारी असलेल्या लोकप्रतिनिधींनी या प्रकरणी लक्ष द्यावे अशी मागणी विवाहितेकडून होत आहे अन्यथा मी पारनेर पोलिस ठाण्यासमोर आत्मदहन करेल असा इशारा विवाहितेने दिला आहे.