नेप्तीत मोहरम निमित्त नेप्तीत सामाजिक एकतेचे दर्शन!

अहमदनगर प्रतिनिधी-
नगर तालुक्यातील नेप्ती येथे मोहरमच्या दहाव्या दिवशी गावातील नालसाब, इमामी कासम, मौला आली यांच्यासह ताबूतचे धार्मिक वातावरणात विसर्जन करण्यात आले. गावातील मोहरमच्या विसर्जन मिरवणुकीत युवकांसह हिंदू-मुस्लिम समाजातील बांधवांनी सहभागी होवून सामाजिक एकतेचे दर्शन घडविले असल्याची माहिती रामदास फुले यांनी दिली
यावेळी माजी उपसरपंच फारूक सय्यद, मार्केट कमिटीचे माजी संचालक वसंत पवार, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष रामदास फुले ,उपसरपंच दादू चौगुले, पोलीस पाटील अरुण होले, शिवाजी होळकर, जालिंदर शिंदे ,मुनीर सय्यद, प्रा. एकनाथ होले, भानुदास फुले बाबूलाल सय्यद, जावेद सय्यद, जमीर सय्यद, गुलाब सय्यद, राहुल चौगुले, साजिद सय्यद, हुसेन सय्यद, संतोष चहाळ, कारभारी जपकर, उमर सय्यद, युनुस सय्यद, नौशाद शेख, सिकंदर शेख, मुख्तार सय्यद, सलीम सय्यद, कय्युम सय्यद, बादशाह सय्यद, वाजिद सय्यद, नसीर सय्यद, शाहबाज सय्यद, साहिल सय्यद, अरबाज शेख, रमिज सय्यद, आसिफ सय्यद ,अदिल सय्यद, आशिष शेख, महबूब सय्यद,नवेद शेख बादशहा सय्यद, एजाज सय्यद, हन्सार सय्यद, बबन सय्यद, राहुल चौगुले, रंगनाथ जपकर, राहुल गवारे, रफिक सय्यद, आसिफ शेख, नितीन पवार ,नाले हैदर यंग पार्टीचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे गावातील हिंदू मुस्लिम युवक एकत्र येऊन मौलाना मुनीर सय्यद, हुसेन सय्यद व कय्युम सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली सवाऱ्यांची स्थापना कारतात. स्थापनेच्या दिवशी नाले हैदर यंग पार्टीच्या वतीने इमामवाडा परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तसेच दहा दिवस गावात इमाने हसन-हुसेन यांनी धर्मासाठी दिलेल्या बलिदानाची माहिती देणाऱ्या मजलीसचे आयोजन करण्यात आले होते. मजलीसनंतर भाविकांमध्ये प्रसादचे वाटप करण्यात आले. दहा दिवस गावात धार्मिक वातावरणात मोहरम उत्सव उत्साहात व शांततेत पार पडला. मोहरमच्या दिवशी ढोल- ताशांच्या गजरात मिरवणूक निघाली होती. चौका-चौकात सवारीवर भाविकांनी चादर अर्पण केल्या. यावेळी भाविकांमध्ये सरबतचे वाटप करण्यात आले. पवार मळा येथील विहिरीत सवाऱ्यांचे विसर्जन करण्यात आले.-
——