शरद पवार अकोल्यात फुंकणार विधानसभेची तुतारी!

सुनील गिते
अकोले दि 19
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार हे अकोले तालुक्यात उद्या शुक्रवारी येत आहे त्यांच्या उपस्थितीत अकोले बाजार तळावर भव्य शेतकरी मेळावा होत आहे या मेळाव्यात ते अकोले विधानसभा निवडणुकी ची तुतारी फुंकणार आहे
अकोले तालुक्यातील लोकनेते स्वर्गीय अशोकराव भांगरे यांच्या 61 व्या जयंतीच्या निमित्ताने भांगरे कुटुंबीयांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला ते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे लोकसभेच्या निवडणुकीनंतर ते प्रथमच अकोले तालुक्यात येत असल्याने त्यांच्या अकोले भेटीला विशेष महत्व आहे
राज्यातील विविध राजकीय घडामोडीनंतर ते प्रथमच अकोले तालुक्यात येत आहे यामुळे त्यांच्या या भेटीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे अकोले तालुक्यातील एके काळचे त्यांचे सहकारी मधुकरराव पिचड माजी आमदार वैभवराव पिचड यांनी भाजप प्रवेश करून शरद पवारांची साथ सोडली त्यानंतर 2019 ला पवारांच्या आशीर्वादाने डॉक्टर किरण लहामटे आमदार झाले परंतु पक्ष फुटीने त्यांनीही शरद पवारांची साथ सोडली व अजित दादा गटात सामील झाले शरद पवारांच्या दोन्ही सहकाऱ्यांनी साथ सोडल्यानंतर अकोल्यातील राजकीय आखाड्यातील सुधारणा करण्यासाठी ते पुन्हा येत आहे अकोले तालुक्यात आल्यानंतर ते काय गुगली टाकणार याकडे सर्वांचा नजरा लागल्या आहे
लोकसभा निवडणुकी नंतर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आणण्यासाठी शरद पवार यांनी कंबर कसली आहे त्यानुसार प्रत्येक मतदार संघाची बांधणी ते करत आहे
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोर्चे बांधणी सुरू केली आहे त्याचाच भाग म्हणून ते अकोले तालुक्यात दौऱ्यावर येत आहे
अर्थात त्यांचे स्वर्गीय अशोकराव भांगरे यांच्या कुटुंबाशी पहिल्या पासून असलेले घट्ट नाते आहे म्हणून ते स्व भांगरे यांच्या जयंती च्या कार्यक्रमास येत आहे
एके काळचे त्यांचे खंदे समर्थक असणारे सहकारी मधुकरराव पिचड यांनी त्यांची साथ सोडून भाजपात प्रवेश केला त्याचा वचपा त्यांनी 2019 च्या अकोले विधानसभा निवडणुकीत काढला भांगरे -लहामटे यांची मोट बांधत वैभव पिचड यांचा
2019 च्या विधानसभा निवडणुकीत पराभव घडून आणला आणी डॉक्टर किरण लहामटे यांना आमदार केले
राज्यातील राजकीय घडामोडीनंतर शिवसेनेबरोबरच राष्ट्रवादीचे दोन शकले झाली आणि पवारांच्या राष्ट्रवादी मधून अजित पवार बाहेर पडेल आणि राष्ट्रवादीचे ही दोन गट झाले
शरद पवार यांच्या खंबीर पाठबळावर निवडून आलेले लहामटे शरद पवारांची साथ सोडून अजित दादा पवार यांच्याबरोबर गेले
आमदार लहामटे पवारांची साथ सोडून गेल्याने अकोले मतदारसंघात मात्र भांगरे कुटुंबियांनी पवारांना साथ दिली पडत्या काळात भांगरे कुटुंबीय पवारांच्या पाठीशी राहिले तालुक्यात त्यांनी शरद पवार गटाची चांगली बांधणी केली म्हणून अमित भांगरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युवा जिल्हा अध्यक्ष पद दिले त्यांनी देखील त्या पदाला न्याय देत काम सुरू केले
विधानसभेच्या आगामी निवडणुका ंच्या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यातील राजकीय हालचालींना सुरुवात झाली आहे विकास कामांच्या जोरावर लहामटे पुन्हा विजयाचा दावा करत आहे
त्यांच्यावर एकाकी वागण्याच्या स्वभावाने त्यांच्यापासून अनेक कार्यकर्ते दुरावले गट तट निर्माण झाले तरी लहामटे यांनी
अकेला चलो चा नारा देत मायबाप जनतेच्या भरोशावर विकास कामांचा रेटा चालू ठेवला तालुक्यात त्यांनी दोन हजार कोटींचा पेक्षा अधिक विकास निधी आणल्याचे तेसांगतात
तर भाजप हा सत्तेतील पक्ष असल्याने भाजपचे माजी आमदार वैभवराव पिचड हे देखील तालुक्यात आलेला निधीं हा एकट्या कुणा व्यक्तीचा नाही तर विकास निधी हा महायुती सरकारचा आहे निधी हा कोणा पक्षाचा नसतो तर तो सरकारचा असतो असे सांगत आहे
तर दुसरीकडे शरद पवार गटाचे आमदार किला भांगरे कुटुंबाला तिकीट निश्चित असल्याचे मानून स्व अशोक भांगरे यांच्या पत्नी श्रीमती सुनीता भांगरे त्यांचे पुत्र युवा नेते अमित भांगरे , विधानसभेच्या तयारीला लागले आहे त्यासाठीच त्यांनी आपल्या वडिलांच्या 61 व्या स्मृतिदिनी च्या कार्यक्रमासाठी शरद पवार यांना निमंत्रित केले आहे भांगरे कुटुंबीयांचे हे निमंत्रण त्यांनी आनंदाने स्वीकारत अकोल्यात येण्याचा शब्द त्यांना दिला आहे म्हणूनच शरद पवार हे आज शुक्रवारी 19 जुलै रोजी अकोल्यात येत आहे शरद पवार हे अकोल्यात येत असताना आगामी विधानसभेच्या निवडणुकीची तुतारी फुंकणार हे निश्चित आहे सुनिता ताई भांगरे किंवा अमित दादा भांगरे हे दोन उमेदवार या दोघांपैकी एकाला उमेदवारी हे निश्चित मानले जात आहे
असे असताना मधुकरराव पिचड पिता-पुत्र हे शरद पवार गटाला मिळणार असल्याच्या चर्चा तालुक्यात सुरू आहे यामुळे ही पिचडांच्या घर वापशी चर्चेला आता चांगली सुरुवात झाली आहे त्यांच्या घराची चर्चेला खुद्द शरद पवार काय उत्तर देतात याकडे तालुक्यातील जनतेची आता लक्ष लागले आहे शुक्रवारी भांगरे कुटुंबियांनी आयोजित केलेल्या या मिळाव्याला मोठे शक्ती प्रदर्शन होणार असून होत आहे या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे कार्यक्रमासाठी अकोले बाजार तळावर सकाळी दहा वाजता जाहीर शेतकरी मेळावा पार पडणार आहे यासाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे गटनेते बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली व राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या सह राज्य व जिल्ह्यातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थीत रहात आहे