अकोल्यात बांधकाम कामगारांची ग्रामसेवकांकडून अडवणूक !
अकोले प्रतिनिधी
भारतीय दलित महासंघाच्या संघटनेचे सभासद असणारे अनेक
बांधकाम कामगार म्हणून नोंदणी झालेली आहे. बांधकाम कामगारांचे कार्ड नुतनीकरणासाठी आलेले आहे. संबंधित कामगारांचे कार्ड नुतनीकरण होणे खुप गरजेचे आहे. परंतु सदर
कामकागारांचे कार्ड नुतनीकरणासाठी त्या त्या गावातील संबंधित ग्रामसेवक अडथळा निर्माण करीत आहे अर्जावर
सही शिक्के देण्यास नकार देत आहे. त्यामुळे कामगारांचे खुप मोठे नुकसान होत आहे. ग्रामसेवकांचे आडमुठे धोरणामुळे सदर कामगारांचे कार्ड नुतनीकरण होण्यास अडचण तयार होत आहे.
ग्रामसेवक संघटनेच्या आडून सही व शिक्का देण्याचे अडवणूक करत आहेत त्यांना तातडीने आदेश करावे व कामगारांना न्याय मिळवून देण्यात यावा. अन्यथा भारतीय दलित महासंघाच्यावतीने गुरुवार दि. ०८/०८/२०२४ रोजी अकोले गटविकास अधिका-यांच्या दालनात ठिय्या आंदोलन व आमरण उपोषण असा इशारा भारतीय दलित महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश खरात यांनी दिला आहे
——-
जिल्हा परिषदेचे मुख्यबकार्यकारी
