
शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
भगवंताचे नामस्मरण हे जीवनामध्ये सुख व शांती प्रधान करणारे सर्वात मोठे साधन आहे. संत महंतांनीही ईश्वर प्राप्तीचा मार्ग दाखवताना नामस्मरणाचे महत्त्व सांगितले आहे. स्वच्छ व निर्मळ भक्ती मनुष्याला अखंड शांती प्रदान करते. असे मत माऊली वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र पैठण तथा बालसंस्कार केंद्राचे प्रमुख संतोष महाराज ठेंणगे ( गुंफा ) यांनी व्यक्त केले.
शेवगाव – नेवासा राज मार्गावरील भातकुडगाव फाट्यापासून जवळच असणाऱ्या श्री क्षेत्र गुंफा येथील स्वयंभू श्री काळेश्वर देवस्थानच्या प्रांगणात श्रावण पर्वणी निमित्त आयोजित सोमवार निमित्त कीर्तन महोत्सवात महाराज बोलत होते.यावेळी त्यांनी शिवमहिमा मधील अनेक पौराणिक संदर्भ देऊन नाम व भक्ती श्रेष्ठ आहे.यावर विवेचन केले.
यावेळी काळेश्वर संस्थांचे लहानु महाराज कराळे, यश महाराज साबळे, दत्ता महाराज जाधव, भातकुडगावचे माजी सरपंच शंकरराव नारळकर, बाळासाहेब काळे,ज्येष्ठ पत्रकार आर आर माने, भास्कर चोपडे, संतोष आहेर, संजय आहेर, शेषेराव काळे, दिलिप सांवत, विठ्ठल चोरमारे, विजय नजन, विजय काळे, सोपान नजन, पांडुरंग गडाख,भाऊसाहेब आहेर, आसाराम खंडागळे, जालिंदर आहेर, नवनाथ आठरे, दत्तादेवा गोसावी, बाळकृष्ण तोगे, प्रवीण खंडागळे याच्यासह काळेश्वर तरुण मंडळ, काळेश्वर सप्ताह कमिटी गुंफा व परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कल्याण सांवत यांच्या वतीने महाप्रसादाची पगंत देण्यात आली.
दिनांक १२ /०८/ २०२४ रोजी दुसऱ्या सोमवारी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत महेश महाराज काळे काळेश्वर देवस्थान गुंफा यांचे हरिकीर्तन होईल व त्यानंतर भातकुडगावचे अशोकभाऊ फटांगरे यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल. तरी या कार्यक्रमासाठी परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.