गुरुवर्य पाटणकर सर्वोदय विदयालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न.
अकोले प्रतिनिधी
भारत माता की जय,जय जवान जय किसान,भारतीय स्वातंत्र्य दिनाचा विजय असो.आदी घोषणा देत राजूर येथील सत्यनिकेतन संस्थेचे गुरूवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय राजूर येथे भारतीय स्वातंत्र्याचा ७८वा.स्वातंत्र्य दिन उत्साही वातावरणात संपन्न करण्यात आला.याप्रसंगी सत्यनिकेतन संस्थेचे जेष्ठ संचालक विजय पवार यांचे हस्ते विद्यालयाचे ध्वजारोहन करण्यात आले.स्काऊड व गाईड,एनसीसी पथक,हरित सेना पथक यांच्या शिस्तबद्द नियोजनानुसार एनसीसी छात्रांनी ध्वजाला मानवंदना दिली.
यावेळी संचालक एस.टी.येलमामे, श्रीराम पन्हाळे,विलास पाबळकर,डॉ.रमाकांत डेरे,प्रविण डेरे, भारती महाले, माजी प्राचार्य मनोहर लेंडे,सुनिल पाबळकर,विदयालयाचे प्राचार्य बादशहा ताजणे, उपप्राचार्य अण्णासाहेब धतुरे,पर्यवेक्षक सदाशिव गिरी, अधिक्षक मच्छिंद्र ढगे,क्रीडा शिक्षक जालिंदर आरोटे, एनसीसी प्रमुख एस.आर.देशमुख, स्काऊड पथक प्रमुख राजेविनोद साबळे,गाईड पथक प्रमुख राठोड मॅडम,हरित सेनाप्रमुख श्रीकांत घाणे यांसह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी राष्ट्रगीत,ध्वजगीत, हम सब भारतीय है, हम होंगे काम याब एक दिन, जय जय महाराष्ट्र माझा आदी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करण्यात आले.