इतर
उस्थळ दुमाला येथे माजी सैनिक सन्मानीत

सोनई — उस्थळ दुमाला येथील श्री समर्थ सद्गुरु किसन गिरी बाबा विद्यालयात ज्यांनी देशसेवेसाठी योगदान दिले,त्यांचा स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्यध्यापक श्री.रावसाहेब सोनसळे व विद्यालयाच्या वतीने पुस्तक,शाल,श्रीफळ देऊन सन्मानीत केले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.दहावी परीक्षेत ज्यांनी यश संपादन केले त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी वृक्ष लागवडही हा उपक्रम राबविला.याप्रसंगी मेजर देविदास वाघ,प्रल्हाद बागुळे,कराळे, गोवर्धन सानप,शरद डोईफोडे,मेजर संभाजी माळवदे,सहायक पोलिस निरीक्षक संदीप साळवे,सरपंच संगीताताई गायकवाड, सोसायटीचे चेअरमन राजाभाऊ गायकवाड, माजी सरपंच किशोर सुकळकर, खरेदी विक्री संघाचे संचालक जनार्दन पिटेकर, अनिल गायकवाड, यांच्यासह अन्य उपस्थित होते.