इतर

विविध मागण्यांसाठी शेवगाव तहसील वर मोर्चा


शहाराम आगळे
शेवगांव तालुका प्रतिनिधी


भारतीय कम्युनिस्ट पक्ष,आयटक आशा व गटप्रवर्तक कर्नचारी संघटना व ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ शेवगांव तालुका यांच्या संयुक्त वतीने शासनाविरोधात तहसील कार्यालय कामगार व जनतेच्या मागण्या घेऊन कॉम्रेड संजय नांगरे व कॉम्रेड संदिप इथापे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला

.मोर्चाच्या मुख्य मागण्या या पुढीलप्रमाणे “जात निहाय जनगणना करा, आरक्षणाची ५०% मर्यादा उठवा, सर्व कामगारांना सहव्वीसवीस हजार रुपये किमान वेतन करा,आशा व गट प्रवर्तक कर्मचारी यांना किमान वेतन,शासकीय कर्मचा-याचा दर्जा व निवृत्ती नंतर पेन्शन द्या,कष्टकरी वर्गाला साठ वर्षांनंतर पाच हजार रुपये पेन्शन द्या , कामगार भरती करा, बेरोजगारी संपवा, महागाई कमी करा, कंत्राटी करून खाजगीकरण थांबवा,स्मार्ट मीटर मागे घ्या, महिला मुली यांच्यावरील अत्याचार तातडीने थांबवा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यास जबाबदारांवर कारवाई करा, मागेल त्याला रेशन द्या, शिक्षणाचा बाजार थांबवा , शेतीमालाला हमीभाव द्या, स्वामीनाथन आयोग लागू करा, भ्रष्टाचार थांबवा, यासोबतच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे एकोणीस महिन्यांची वेतन यावलकर समिती व थकित वेतन द्या या मागण्या शासनाने त्वरित पूर्ण कराव्यात. यावेळी कॉ. संजय नांगरे म्हणाले “राज्यात देशात महिला सुरक्षित नाहीत, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळतो आहे, रोज वृत्तपत्रांमध्ये गुन्ह्यांच्या बातम्या येत आहेत, अशावेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री हे फोटो काढत मिरवत फिरत आहेत, कष्टकरी वर्गाच्या मागण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, बेरोजगारांची भरती केली जात नाही, मनुस्मृतींना अनुसरून हे सरकार काम करीत आहे. त्यामुळेच राज्यात ही परिस्थिती निर्माण झाली आहे.” म्हणून मुख्यमंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री हे निशकिय असल्याने यांनी त्वरित राजीनामे द्यावेत.

यावेळी गोरक्षनाथ काकडे, राम लांडे, शमा सयद, संतोष लहासे, बापुसाहेब तुतारे, शेख अब्दुल, सयद बाबुलाल,आंधळे आदिनाथ, सुलभ महाजन, रंजना परदेशी, पोर्णिमा इंगळे, वैशाली देशमुख, संगिता रायकर, वर्षा निजवे, स्वाती गाढेकर, क्रांती थोरात, कावेरी खंडागळे, मंदा नागरे, तारा आव्हाड, लता आव्हाड, नामदेव सानप, संजय तेलोरे, ज्योती नागरे, उषा थोरात, सविता हजारे, मनिषा दिवटे, सौ.साळुंके सह मोठया संख्योने कर्मचारी व नागरीक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button