अखेर… नगरसेवक अशोक चेडे यांच्या आंदोलनाला यश.

दत्ता ठुबे
पारनेर दि.१३ पारनेर प्रतिनिधी
सालाबाद प्रमाणे याही वर्षी पारनेर शहरात गणेश मंडळाने गणेशाची प्रतिष्ठापना मोठया आनंदात उत्साहात केली आहे. पण नगर पंचायतचे गलथान कारभारामुळे गणेश विसर्जन करण्यासाठी असलेली बारव परिसरात अस्वच्छता झाली होती.गणेश भक्तांच्या भावनिकतेचा सकारात्मक विचार करून पारनेर नगर पंचायतचे नगरसेवक अशोक चेडे व माजी नगरसेवक विशाल शिंदे यांनी नगर पंचायतचे लक्ष वेधण्यासाठी संबदित जबाबदार. प्रशासकीय अधिकारी यांना बारव तातडीने स्वछ करण्यासाठीचे लेखी निवेदन दिले होते.या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून नगर पंचायत प्रशासनाने तातडीने पोकलॅण्डचे साहाय्याने गणेश विसर्जन बारव स्वछ केली आहे.
सविस्तर माहिती अशी की, पारनेर शहरात बहुतांश मंडळांनी गणेश चतुर्थीचे दिवशी गणेशाची प्रतिष्ठापना मोठया आनंदात उत्साहात केली आहे. परंतु नगर पंचायतचे गलथान कारभारामुळे पारनेर शहरातील गणेश मंडळे ज्या गणेश विसर्जन बारवेत गणपती विसर्जन करत होती ती बारव परिसरात कमालीची अस्वच्छता होती. तर या विसर्जन बारवेत गेल्या दोन वर्षांपासूनचे गणेशाच्या मूर्तीचां खच साचलेला होता. नगर पंचायतने दोन वर्षात एकदा पण हि गणेश विसर्जन बारव स्वछ करण्याची तसदी घेतली नाही. या समस्येची दखल घेउन शहरातील नगरसेवक अशोक चेडे व माजी नगरसेवक विशाल शिंदे यांची गणेश विसर्जन बारवेची पाहणी केली. नगर पंचायत प्रशासन यांना या समस्या बाबत अवगत करण्यासाठीं लेखी निवेदन दिले होते. त्याच्या या लेखी निवेदनाची तात्काळ दखल घेऊन नगर पंचायत प्रशासनाने पोकलॅण्ड चे साहाय्याने या गणेश विसर्जन बारवेतील दोन ट्रॅक्टर ट्रॉली भरून खच असलेल्या मूर्तींचा मैला बाहेर काढला. त्या मुळे गणेश विसर्जन बारव स्वछ झालीं आहे.नगरसेवक अशोक चेडे व माजी नगरसेवक विशाल यांचे आंदोलनाला यश आले आहे. त्या मुळे शहरातील नागरीक नगर सेवकांचे आभार मानत आहेत.