इतर
अकोल्यातील शिवतेज उगले याची केरळ येथे इस्त्रोशैक्षणिक सहलीसाठी निवड

अकोले प्रतिनिधी
डॉ. विक्रम साराभाई स्पेस थुंबा केरळ, इस्रो शैक्षणिक
सहलीसाठी जि. प. प्राथमिक शाळा पिंपळगाव निपाणीच्या शिवतेज प्रदिप उगले याची निवड झाली.
त्यास वर्गशिक्षिका शारदा गीते तसेच शिवतेजची आई प्राथमिक शिक्षिका अस्मिता ठुबे, पालक प्रदीप उगले व
मुख्याध्यापक गोरक्षनाथ ढगे, शिक्षक सतीश वामन कोटकर व शिक्षक वृंदाचे मार्गदर्शन लाभले. या निवडीबद्दल शिक्षण विस्तार अधिकारी अनिल गायकवाड, केंद्रप्रमुख सुनील घुले, गटशिक्षणाधिकारी अभयकुमारवाव्हळ, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दौलत महाले व सर्व सदस्य यांनी शिवतेजचे अभिनंदन केले आहे.