इतर

ई पी एस ची पेंन्शन किमान 5000 रूपये करा पुणे जिल्हाधिकारी कार्यालया समोर निर्दशने

पुणे दि 20 – ईपीएस 95 ची योजना खाजगी ऊद्योगातील कामगारांच्या करिता लागु आहे. या कामगारांना सध्या किमान पेंशन रू 1000 असुन त्या नुसार निवृत्त कामगारांना पेंन्शन रक्कम मिळते, पण सदरील रक्कम ही सध्याच्या महागाईच्या काळात सदरील रक्कम अल्प आहे. या रकमे मध्ये एका वेळी जेवण ही खर्च भागविणे शक्य नाही . पेन्शनभोगी कामगारांना निवृत्ती नंतर किमान गरजा,आरोग्य सुविधा मिळण्यासाठी, सन्मानजनक रक्कम मिळणे आवश्यक आहे. या करिता भारतीय मजदूर संघाने संपुर्ण देशात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर लाक्षणिक निदर्शने करून निवेदन देण्यात आले.
पुणे येथे भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे निर्दशने करून निवेदन देण्यात आले आहे .
सदरील निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय वतीने मा निवासी जिल्हाधिकारी .श्रीमती ज्योती कदम यांनी स्विकारून या बाबतीत सरकारकडे पाठवून अवगत करण्याचे आस्वासन दिले आहे.

भारतीय मजदूर संघाच्या प्रमुख मागण्या

1 ) EPS 95 पेन्शन महागाई निर्देशांकाशी जोडा

2 ) EPS 95 पेन्शन किमान 5000/- झाली पाहिजे

3 ) सर्व पेन्शनर्सना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळाला पाहिजे

भारतीय मजदूर संघाच्या शिष्टमंडळात प्रदेश उपाध्यक्ष सुरेश जाधव, पुणे जिल्हा सचिव सागर पवार,जिल्हा पदाधिकारी उपाध्यक्ष मनोज भदारगे, अण्णा महाजन, शिवशंकर हिंगे, उमेश आणेराव , केदार कदम उपस्थित होते , निदर्शने मध्ये सुरेश जाधव, नीलेश खरात, अंकुश राऊत, आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते
निदर्शने मध्ये खाजगी ऊद्योग , वीज ऊद्योग , बीडी उद्योग , सिक्युरिट, बॅंक, एल आय सी उद्योगातील व वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button