
दत्ता ठुबे /पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील जनता कोरोना संकटात सापडली असताना सरकारी सुविधा असणा-या शासकीय कोरोना सेंटर मध्ये गलिच्छ राजकारण करून स्वतःच्या प्रसिद्धी साठी दुःखी जनतेच्या भावनेशी खेळू नये असा टोला मनसे चे नेते अविनाश पवार यांनी आमदार लंके यांना लगावला आहे
पारनेर तालुक्यात पावसाने नागरिकांची शेती,पिके रस्ते, वाहुन गेले . शेतकरी अक्षरशः मेटाकुटीस आला आहे,उध्वस्त झाला आहे त्यामुळे या गोष्टींचा गांभीर्याने विचार करुन यावर त्वरित मार्ग काढण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करत राजकारण बाजूला ठेऊन शेतकरी बांधवांना मदत मिळावी यासाठी सरसकट मदतीसाठी प्रयत्न करणं लोकप्रतिनिधी म्हणुन गरजेचं असताना ते हार तुरे घेताहेत
राज्य केंद्राच्या धोरणांमुळे बेरोजगारी वाढणार आहे यावर त्यांनी बोलण्यापेक्षा त्यांनी पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसी मध्ये पारनेर तालुक्यातील किती सुशिक्षित भुमीपुञांनी नोकरी दिली हे एकदा आमदारानी जाहीर सांगावे व या ठिकाणी असणारी आपल्या बगलबच्यांची गुंडा गर्दी थांबवावी असे पवार यांनीप्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले
सुपा ठेकेदारीच्या माध्यमातून बगलबच्चे तयार करुन बेरोजगारी निर्माण केली जातआहे.
स्वतच्या मतदार संघातील जिल्हा परिषद शाळाचे दोन दोन वेळा भुमीपुजन करुन सुद्धा शाळा मंदीरामध्ये भरतात हे दुर्दैव आहे.
आगामी काळात जनता तुमची नौटंकी विसरणार नाही, त्यामुळे आगामी काळात जनतेच्या भावनेशी खेळुन राजकारणात पोळी भाजून घेण्याचा चाललेला केविलवाणा प्रयत्न करणा-यांना जनता माफ करणार नाही . विकास कामं फक्त पेपरात छापून चमकोगीरी करण्यासाठी चालु असल्याचा गंभीर आरोप पवार यांनी केला आहे
पारनेर तालुक्यात शेतकरी ओल्या दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेला आहे महसूल प्रशासनाने काटेकोरपणे कामं करून शेतकऱ्यांना न्याय दिला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन छेडलं असा इशारा श्री पवार यांनी दिला आहे.