
अकोले प्रतिनिधी
आबिटखिंड ( ता अकोले )येथे निसर्ग व सामान्य पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळ व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी मुंबई विभाग व भैरवनाथ सेवा मंडळ, आबिटखिंड, नोकरदार वर्ग ग्रामिण / मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने 500 झाडांना ट्रिगार्ड लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री. प्रमोददादा मोरे अध्यक्ष निसर्ग व सामाजिक पर्यावरण
प्रदुषण मंडळ, या उपस्थितीत संपन्न झाला.या कार्यक्रमासाठी श्री. मयुर बेरड ,तहसिलदार, नगर, श्रीमती छायाताई राजपुत, कार्याध्यक्षा सौ. सकुंतलाताई धराडे, ( माजी महापौर) सौ.।वनश्रीताई मोरे-गुणवरे, सचिव, प्राध्यापक डॉ. प्रविण गुणवरे, कार्याध्यक्ष,
डॉ. अनिल लोखंडे, सचिव, श्री. तुकाराम अडसुळ, जिल्हाध्यक्ष, श्री. संजय गायकवाड, सह-सचिव, डॉ. शरद दुधाट, राज्य संघटक श्री. बाळासाहेब डोंगरे, राज्य संघटक, सौ. राजश्रीताई अहेर, श्री. रामेश्वर चेमटे, सर, श्री. बाळासाहेब ढोले सर, श्री. सुनिल घुले, श्री. संजय कारखिले, राज्य संघटक, श्री.बाळासाहेब गाडेकर, श्री. सुधाकर शेटे, तसेच अबिटखिंड गावातील प्रथम नागरीक सौ. युमनाताई घनकुटे, सरपंच श्री. विजय घनकुटे (अध्यक्ष आदिवासी शिक्षण प्रसारक मंडळ), श्री. राजेंद्र उकिरडे, मुख्याध्यापक, श्री. गोविंद घनकुटे, श्री. सुधाकर गोडे, श्री. मुरलीधर गोडे, श्री. चंद्रकांत भोजने,
(संघटक), श्री.अनिल भोजने, श्री. सावळेराम मुठे, श्री. किसन भांडकोळी, श्री. भागा भोजने, श्री. अनंता तिटकारे, श्री. सुनिल शिंदे, सचिव, हे ग्रामस्थ या उपस्थित होते.
आबिटखिंड गावातील पर्यावरण व निर्सग यांचा समतोल राखण्यासाठी 15 ऑगष्ट रोजी 500 झाडांचे रोपण करुन त्यांना ट्रिगार्डचे संरक्षण देऊन झाडे जगविण्याचा संकल्प भैरवनाथ सेवा मंडळ, नोकरदार
वर्ग, ग्रामिण मुंबई ग्रामपंचायत आबिटखिंड, शेतकरी, विद्यार्थी, ग्रामस्थ महिला बंधू आणि भगिनी तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आबिटखिंड, भोजनेवाडी, वाजेवाडी, तसेच भजनी मंडळे यांनी सहभाग घेऊन गावाच्या विकासामध्ये आणि पर्यावरणाचा विकास करण्यासाठी संकल्प केलेला आहे.

भविष्यामध्ये आबिटखिंड गांव हे कृषी पर्यटन केंद्र म्हणून घोषित व्हावे आणि शेती, सार्वजनिक ठिकाण, रस्ता आणि पडकी जमिनीवरती वृक्षांचे रोपन करुन
शेतकऱ्याचे माध्यमातुन पर्यावरण समृध्द करण्यासाठी व गावचा विकास करण्यासाठी सर्वानी एकत्र येऊन काम करावे व गांवचा शैक्षणिक, सामाजिक, संस्कृतीक विकास घडावा या उद्देशाने भैरवनाथ सेवा मंडळाचे
अध्यक्ष श्री. रामनाथ भोजने, उपाध्यक्ष श्री. भानुदास घनकुटे, सचिव श्री. सुनिल शिंदे, खजिनदार श्री. लालू भोजने, सदस्य श्री. सुरेश भवारी, श्री. देवराम भवारी, यांनी हा संकल्प केला असल्याचे रामनाथ भोजने यांनी सांगितले
