
दत्ता ठुबे
पारनेर दि.२
पारनेर शहरा पासून तीन किमी अंतरावर असणाऱ्या तीन डोंगराच्या मध्यस्थानी हिरवेगार गालिचेने वसलेले हेमाडपंथी जागृत देवस्थान सिद्धेश्वर मंदिर आहे. या मंदिराच्या परिसरात पूर्वकालीन दगडी बांधकाम असलेली बारव आहे. या परीसरात गेल्या काही दिवसांपूर्वी मुबलक प्रमाणात पाउस झाल्याने या परिसरातील ओढे, नाले, नद्या, बारव तुडुंभ भरलेल्या आहेत. या तुडुंभ भरलेल्या बारवेच्या निळ्या भोर स्वच्छ पाण्यात पारनेर शहरासह परिसरातील नागरीक, लहान मुले, मुली, विद्यार्थी मनसोक्त पोहण्याचा आनंद लुटताना दिसुन येत आहे.
सिध्देश्वर मंदीर पारनेर शहरा पासून अगदी जवळच तीन किमी अंतरावर असल्याने पारनेर शहरातील नागरीक, लहान मुले, मुली, विदयार्थी विद्यार्थीनी पालक समवेत सकाळी सहा वाजल्यापासून दहा अकरा वाजे पर्यंत या स्वछ पाणी असलेल्या बारवेत मनसोक्त पोहण्याच्या आनंद लुटत आहेत. तर काही नवखे अनुभवी पोहणारा कडून पोहण्याचे प्रशिक्षण घेत आहेत. सकाळ पासूनच या बारवेत पोहणाराची भरपूर गर्दी असते. या बारवेचे वाहते पाणी असल्याने कायमच पाणी निळे भोर स्वछ दिसते त्या मुळे या स्विमिंग पुल सारखं दिसणारे पाण्यात पोहण्याची कला काही औरच अशी आहे.या मंदिर परिरसात निसर्ग रम्य ठिकाण असल्याने पारनेर शहरासह परिसरातील नागरिकांची ओढ निर्माण झाली आहे. शिरूर सारख्या शहरातून अक्षय भोसले व दिपाली भोसले यांचे कुटुंब पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी आले होते.त्याची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की, शहरातील धावपळीत लहान मुलांचे बालपण हरवत चालले आहे. लहान मुलांना अभ्यासा व्यतरिक्त त्यांना मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी अश्या निसर्ग रम्य ठिकाणीं पोहण्या साठी आणले आहे. सुट्टीचा पूर्ण दिवस या निसर्ग रम्य ठिकाणीं घालवण्याने एक आनंददायी अनुभव घेता आला.परिसरातील पालकांनी लहान मुलां समवेत या निसर्ग रम्य ठिकाणीं यावे व एक मानसिक आनंददायी अनुभव घेण्याचे आवाहन करत आहोत.