आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत बुधवारी अकोल्यात

अकोले प्रतिनिधी
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय राजुर अंतर्गत आदिवासी मुलींचे वसतिगृह राजुर व
आदिवासी मुलांचे वसतीगृह पिंपरकणे या वसतीगृहांचे भुमीपुजन आदिवासी विकास मंत्री श्री. विजयकुमार
गावीत यांच्या हस्ते बुधवार दि.09 ऑक्टोंबर रोजी राजुर येथे संपन्न होणार असल्याची माहिती राजुर
प्रकल्पाच्या प्रकल्प आधिकारी श्रीम. देवकन्या बोकडे यांनी दिली.
बुधवारी सकाळी 10.00 वाजता आभासी प्रणालीद्वारे सदर वसतीगृहांचे भुमीपुजन संपन्न होणार असुन या
कार्यक्रमासाठी मा. श्री. राधाकृष्ण विखे पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार आहेत. तसेच
कार्यक्रासाठी खासदार श्री. भाउसाहेब वाकचौरे, आ. किशोर दराडे, आ. राम शिंदे, आ.सत्यजित तांबे, डॉ.
किरण लहामटे, मा. आ. वैभव पिचड यांच्यासह मा. विजय वाघमारे सचिव आदिवासी विकास, मा. नयना
गुंडे आयुक्त आदिवासी विकास नाशिक मा. सिध्दराम सालिमठ जिल्हाधिकारी अहमदनगर, मुख्य
अभियंता आबासाहेब नागरगोजे, पुष्पाताई निगळे सरपंच राजुर इ. मान्यवर उपस्थित राहणार असुन
परिसरातील आदिवासी बांधवांनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. निरज चौरे कार्यकारी
अभियंता व श्री. संदिप गोलाईत अप्पर आयुक्त नाशिक यांनी केले आहे.