राज्यातील सर्वोत्कृष्ट पाच पोलीस स्टेशनमध्ये राजूर ची निवड!

विलास तुपे
राजूर प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्यातील व अकोले तालुक्यातील राजूर पोलीस स्टेशनची राज्यातील सर्वोत्कृष्ट पाच पोलीस स्टेशनमध्ये निवड झाली असल्याची माहिती पोलिस अधिक्षक मनोज पाटील यानी दिली
राजुर पोलीस स्टेशनमधील तत्कालीन अधिकारी स पो नि नितीन पाटील व प्रभारी स पो नि नरेंद्र साबळे तसेच कर्मचाऱ्याच्यां कामाचे श्री मनोज पाटील यांनी कौतुक केले आहे.
पोलीस दलातील सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्यांच्या निवड प्रक्रियेत राज्यातील पोलीस ठाण्यांची कार्यक्षमता आणि कामगिरी, गुणवत्ता वाढविणे, दिलेल्या मर्यादेमध्ये उत्कृष्ठ पध्दतीने काम करणे तसेच गुन्हेगारीला प्रतिबंध व गुन्ह्यांचा तपास आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्रोत्साहित करणे हा हेतु साध्य करण्यासाठी राज्य पातळीवर सर्वोकृष्ट पाच (५) पोलीस ठाण्यांची निवड करण्यात येत असते. या पोलीस ठाण्यांना सन्मानचिन्ह व रोख बक्षिस प्रदान केले जाते.
त्या अनुषंगाने राज्यपातळीवर सर्वोकृष्ट पोलीस ठाणे स्पर्धेकरीता निश्चीत करुन दिलेले गुणांकन, निकष, मुल्यमापन व नियमावली आदि बाबींचा बारकाईने विचार करून पोलीस ठाण्याचे निवड केली जाते. सर्वोकृष्ट पोलीस ठाणे निवडण्यासाठी राज्यस्तरावर आयुक्त व परिक्षेत्र निहाय समित्या गठीत करून गुणांकन, निकष, मुल्यमापन व नियमावली आदि बाबींचा काटेकोर पालन करणारे पोलीस ठाणे म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यांनी सहभाग नोंदविला होता.
त्यामुळे पोलीस महासंचालक याच्या मुंबई कार्यालयाकडुन अहमदनगर जिल्ह्यातील राजूर पोलीस स्टेशनची राज्यातील सर्वोत्कृष्ट पाच पोलीस स्टेशनमध्ये निवड केली आहे.
राजुर पोलीस स्टेशनला सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे हा मान मिळणे करीता पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधिक्षक दिपाली काळे, राहुल मदने, उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर विभाग, सपोनि नितीन पाटील, राजूर पोलीस ठाण्याचे तात्कालीन प्रभारी अधिकारी व सपोनि नरेंद्र साबळे, प्रभारी अधिकारी, राजूर पोलीस ठाणे यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.तसेच तसेच आदिवासी भागात असलेल्या मोठे क्षेत्रफळ असताना पुरस्कार मिळाले बद्दल राजूर ग्रामस्थ व परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे