इतर

निघोज परिसरात विकास कामांची आवड असणारे अवलिया माऊली शेठ .

पारनेर – निघोज परिसरातील सर्वच मंदीरे , कुंड परिसर , दशक्रिया विधी स्थळ , बाजार तळ , पालखी विसावा वा इतरत्र सातत्याने लक्ष देवून काही कमतरता , अस्वच्छता जाणविल्यास संबंधीतांच्या निदर्शनास आणून कामे मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणारे , प्रसंगी पदरमोड करून खिश्याला झळ बसवून घेणारे , तसे दुर्मिळच , पण श्री मळगंगा मातेच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या श्री क्षेत्र निघोज नगरी मध्ये असे एक अवलिया आहेत , दुसरे , तिसरे कोणी नसून कोणत्याही पदावर कार्यरत नसलेले ज्ञानदेव लंके ऊर्फ माऊली शेठ होय .
महिन्यातील काही दिवस मुंबईतील कुलाबा येथे व्यवसाया निमित्त राहणारे व जास्तीत जास्त दिवस व क्षण आपल्या मातृभूमी असलेल्या श्री क्षेत्र निघोज नगरीला व ग्रामदैवत असलेल्या श्री मळगंगा मातेच्या सेवेला वाहून घेणारे प्रसिद्ध उद्योजक ज्ञानदेव लंके ऊर्फ माऊली शेठ यांना या परिसरात न ओळखणारा विरळच . गावातील श्री मळगंगा मातेचे सकाळी दर्शन घेतल्या नंतर श्री राम , श्री मारुती , श्री महादेव देवांच्या मंदीरात जावून नतमस्तक होवून श्रद्धा पुर्वक दर्शन घेवून येथे काही कमतरता आहे का ? पुरेशी स्वच्छता आहे का ? काही कामे करणे आवश्यक आहे का ? याकडे स्वतःच्या नजरेने व बारकाईने लक्ष देवून संबंधीतां कडून ही अपुरे कामे करून घेतली , म्हणून सातत्याने पाठपुरावा करणारे माऊली शेठ , वेळप्रसंगी कोणी मदत केली, तर घेतली , नाही केली , तर वेळप्रसंगी स्वत : च्या खिश्याला झळ सोसवून लोकसहभागातून अनेक विकास कामे मार्गी लावली . त्यात उल्लेखनीय काम म्हणजे गावातील कोणाही व्यक्ती चे निधन झाल्यानंतर होणाऱ्या दशक्रिया विधीसाठी जमा होणारे ग्रामस्थ व पै पाहुण्यांना ऊन , वारा , पाऊस यांच्याशी सामना करत उघड्यावर बसावे लागत असे , नेमकी ही बाब हेरून माऊली शेठ यांनी दशक्रिया विधीसाठी ४० X ९५ आकाराचे मोठे पत्र्याचे शेड ६ लाख १२ हजार रुपयांमध्ये उभे केले , याचा उपभोग आता खऱ्या अर्थाने सर्व जण घेतात , त्यामुळे याचा सर्व जण लाभ घेतात . त्याचबरोबर बाजार तळावर लोक वर्गणी व लोकसहभागातून ५ लाख ९० हजार रुपयांमध्ये मोठे पत्रा शेड उभे केल्याने बाजारकरूंबरोबर च इतरांनाही त्याचा उपयोग होवू लागला . तदनंतर गावचे ग्रामदैवत असलेल्या श्री मळगंगा माता मंदिरासमोरील अग्नी कुंडाच्या होमासाठी स्टिल चे रेलिंग २३ हजार ५०० रुपयांत उभे केल्याने मंदिराच्या वैभवात भर पडली तर यात्रा उत्सव , नवरात्र उत्सव वा इतर वेळेस श्री मळगंगा मातेचा पालखी सोहळा ज्या वेळी कुंड पर्यटन स्थळी नेला जातो त्यासाठी पालखीला विसावा घेण्यासाठी मंदिरापासून कन्या विद्यालय व शासकीय प्राथमिक केंद्राजवळ पालखी विसावा बांधण्यात आला.त्यासाठी ४५ हजार रुपये खर्चून संरक्षण लोखंडी जाळी बांधून घेतली त्यामुळे या पालखी मार्गाच्या वैभवात भर पडून संरक्षण ही झाले.कुंड रोड वरील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेजवळ ५१ हजार रुपये खर्चून लवकरच गाय , वासरू यांचे राखोळी शिल्प उभे राहणार आहे तर या कामांबरोबरच गावातील हिंदवी शिक्षण संस्थेच्या विद्यालयास शिक्षणासाठी ५१ हजार रुपयांची मदत स्वच्छेने केली आहे.
माऊली शेठ आता सध्या कोणत्याही पद वा सत्ता स्थानावर नाही तरी देखील पोट तिडकीने गावातील समस्या मांडून त्या मार्गी लावण्यासाठी झटत असतात. मध्यंतरी त्यांनी कुंड पर्यटन स्थळावरील जग प्रसिद्ध असलेले कुंडामधील रांजण खळग्यांमधील १३६ ट्रॅक्टर भरून मोठ्या प्रमाणावर कचरा बाहेर काढून परिसर स्वच्छ केल्याने परिसर लख्ख झाल्याने वैभवात भर पडली.


कोणतेही सार्वजनिक काम करताना ते मनापासून स्वतः वा लोकसहभागातून केल्याने त्याचा आनंद काही औरच असतो , श्री मळगंगा देवस्थान ट्रस्टचे माजी कोषाध्यक्ष ज्ञानदेव लंके ऊर्फ माऊली शेठ यांच्याकडे पाहून जाणवते.बोला श्री मळगंगा माते की जय . . . . . .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button