इतर

पारनेरच्या जागेवरून खलबते…डॉ.श्रीकांत पठारे मातोश्रीवर

दत्ता ठुबे

पारनेर – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला असून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे व शिवसेना तालुकाप्रमुख डॉ.श्रीकांत पठारे यांच्यात या जागेवरून जोरदार खलबते झाली आहेत .
पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरून चर्चा झाली असून पारनेर-नगरच्या जागेवर शिवसेनेने दावा सांगितल्याने यासंदर्भात डॉ.श्रीकांत पठारे यांना तातडीने मुंबईला बोलवण्यात आले . नगर तालुक्यात भेटीगाठी दौरा चालू असतानाच तिथून तातडीने डॉ.श्रीकांत पठारे मुंबई येथे मातोश्री निवासस्थानी दाखल झाले. या बैठकीला शिवसेना नेत्या सुषमा अंधारे, खा . अरविंद सावंत, आ . मिलिंद नार्वेकर, अहिल्यानगरचे शिवसेना संपर्कप्रमुख आ सुनील शिंदे, पारनेर तालुक्यातील गटप्रमुख संतोष येवले, संतोष साबळे उपस्थित होते.
मातोश्री निवासस्थानी झालेल्या या बैठकीबाबत डॉ.श्रीकांत पठारे यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या मोठ्या सहकार्याने महाविकास आघाडीकडून खा निलेश लंके विजयी झाले असून त्यावेळी त्यांनी दिलेल्या शब्दानुसार पारनेर-नगर मतदारसंघाची जागा शिवसेनेला सोडावी , असा आग्रह शिवसेनेने धरला आहे. तसेच खा निलेश लंके हे पारनेर तालुक्यातील आहेत व तेही जूने शिवसैनिक आहेत, त्यामुळे खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असल्याने विधानसभेची जागा शिवसेनेलाच मिळाली पाहिजे , असा आग्रह सर्व शिवसैनिकांचा आहे. याबाबत सर्व अहवाल मातोश्रीवर सादर केला असून महाविकासआघाडीच्या सर्व नेत्यांना याची माहिती दिलेली आहे. तसेच शिवसेनेच्या सर्वच वरीष्ठ नेत्यांनी याबाबत सकारात्मक भुमिका मांडली असून आपल्याकडून मतदारसंघात केलेल्या उपक्रमांचा आढावा व चालू असलेल्या प्रचाराचा आढावा गावनिहाय व बूथनिहाय या बैठकीत आपण मांडला असल्याचे डॉ.श्रीकांत पठारे यांनी सांगितले आहे.
शिवसेना ही निवडणुक मोठ्या ताकदीने लढणार असून कोणत्याही परिस्थितीत पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा डौलाने फडकवणार असल्याचे डॉ.श्रीकांत पठारे यांनी सांगत विधानसभा निवडणुकीला शिवसेना सज्ज असल्याचे अधोरेखित केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button