इतर
शिर्डी येथील ग भा इंदुबाई गोंदकर यांचे निधन

शिर्डी प्रतिनिधी ;
धार्मिक व सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या शांत व मनमिळावू स्वभावाच्या शिर्डी पंचक्रोशीत आदर्श माता म्हणून सुपरिचित असणाऱ्या ग.भा.इंदुबाई भाऊसाहेब गोंदकर पाटील यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले
शिर्डी येथील अमरधाम मध्ये रविवार दि 20 रोजी त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक राजकीय धार्मिक शैक्षणिक सहकार यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता शिर्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेशभाऊ गोंदकर शिर्डी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष गोपीनाथ बापू गोंदकर उद्योजक किशोर गोंदकर यांच्या त्या मातोश्री होत त्यांच्या पश्चात तीन मुले एक मुलगी तसेच जावई सुना नातवंडे पुतणे असा मोठा परिवार आहे