खा. निलेश लंके पक्षाचे स्टार प्रचारक- खा. सुप्रिया सुळे

राणीताई लंके यांचा पारनेर मधून उमेदवारी अर्ज दाखल!
दत्ता ठुबे/ पारनेर प्रतिनिधी
खासदार निलेश लंके हे देशाचे नेते झाले आहेत. पारनेर नगर मतदासंघातील जनतेने पक्षाला एकच नंबरचा खासदार निवडून दिला आहे.या खासदारांने विरोधी पक्षातील उमेदवाराचे चॅलेंज स्वीकारून खासदारकीची इंग्रजी मधून शपथ घेतली.या लंकेचा कोणी नाद नाहि करायचा.लंके कुटुंब अगदी साधं आहे पण मनाने फार मोठ आहे.मुल मुलींना शिक्षणं द्या त्याने समाजात समता स्थापन होते, आणि ही समता फक्त शिक्षणाने येते, पारनेरची माणसे अगदी सच्ची आहेत, खा.निलेश लंके यांचे राज्यात फॅन्स आहेत त्यामुळे निलेश लंके या सार्वत्रिक निवडणुकी साठी राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे स्टार प्रचारक राहतील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्यात सरकार आल्यावर सर्व प्रथम शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्ज माफी करणार, शेतकऱ्यांच्या दुधाला भाव देणार, कांद्याला भाव, महीला अधिकार, तर जो राज्यात भ्रष्टाचार फोफवलेला आहे तो पहिला बंद करणार असे प्रतिपादन संसदरत्न खा. सुप्रिया सुळे यांनी केले ते महाविकास आघाडी चे वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पारनेर नगर विधानसभा मतदार संघातील पक्षाचे उमेदवार राणी ताई लंके यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळी आयोजित केलेल्या पारनेर शहरातील बाजारतळ येथे आयोजित विराट सभेत बोलत होत्या. यावेळी मंचावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार राणी ताई लंके, वंदना गंधाक्ते,राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा सुवर्णा धाडगे, पूनम मुंगसे, राजेश्वरी कोठावळे, शितल वाडेकर,माजी उपनगराध्यक्ष सुरेखा भालेकर, सभापति हिमानी नगरे,पाकिजा शेख, विद्या गंधाडे, प्रियंका जाधव, सविता वाळवे, सविता नगरे, साक्षी घावटे, पारिघा पिसे, जयश्री वाबळे, अलका कदम, आशा पांनमद, आशा पानमंद, नंदा शिंदे, नंदा शेंडगे, राणी वाळुंज, राणी यादव, सुरेखा पठारे, गीता उबाळे, सोनिया राजदेव, सुवर्णा हांडोरे, शारदा गायकवाड, अंजली सूंभे, पल्लवी घाडगे, मीनाक्षी काटे, सविता ढवळे, आदी मान्यवर उपस्थित होत्या.