इतर

आजचे पंचांग व राशिभविष्य दि २६/१०/२०२४

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- कार्तिक ०४ शके १९४६
दिनांक :- २६/१०/२०२४,
वार :- मंदवासरे(शनिवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:२९,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०५:५८,
शक :- १९४६
संवत्सर :- क्रोधी
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- हेमंतऋतु
मास :- अश्विन
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- दशमी समाप्ति २९:२५,
नक्षत्र :- आश्लेषा समाप्ति ०९:४६,
योग :- शुक्ल समाप्ति २९:५७,
करण :- वणिज समाप्ति १६:२०,
चंद्र राशि :- कर्क,(०९:४६नं. सिंह),
रविराशि – नक्षत्र :- तुला – स्वाती,
गुरुराशि :- वृषभ,
शुक्रराशि :- वृश्चिक,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- दु. ०४प. चांगला दिवस,

✿राहूकाळ:- सकाळी ०९:२० ते १०:४७ पर्यंत,

लाभदायक वेळा
शुभ मुहूर्त — सकाळी ०७:५४ ते ०९:२० पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०१:३९ ते ०३:०७ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०३:०६ ते ०४:३२ पर्यंत,

❀ दिन विशेष:-
घबाड ०९:४६ नं. २९:२४ प., भद्रा १६:२० नं. २९:२४ प.,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- कार्तिक ०४ शके १९४६
दिनांक = २६/१०/२०२४
वार = मंदवासरे(शनिवार)

मेष
दिवस संमिश्र जाईल. अधिकार्‍यांशी सबुरीने वागावे. वडीलधार्‍यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. सामाजिक मान मिळेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील.

वृषभ
अधिक व्यावसायिक नफा मिळवण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. नवीन कामात यश मिळेल. सरकारी नोकरांनी स्पष्टता बाळगावी. सामाजिक संबंध फायदेशीर ठरतील. आत्मविश्वास वाढीस लागेल.

मिथुन
दिवसाचा पूर्वार्ध चांगला जाईल. काही अनपेक्षित लाभ मिळतील. मित्रांच्या मदतीने प्रश्न सोडवता येतील. वडीलांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. अनुभव हाच गुरु हे लक्षात घ्या.

कर्क
स्वत:मध्येच रमून जाल. प्रतिस्पर्ध्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. नोकरीतील बदलाला अनुकूल काळ. तुमचे प्रयत्न यशस्वी होतील.

सिंह
विरोधकांच्या युक्त्या लक्षात घ्या. प्रेम जीवनात जवळीक साधता येईल. अज्ञात व्यक्तीशी व्यवहार करू नका. मेहनतीने यश प्राप्त होईल. मित्रांच्या सहकार्याने नवीन संधी मिळेल.

कन्या
कामात तत्परता दाखवा. कौटुंबिक आनंद साधता येईल. मित्रांची मदत घ्याल. रखडलेली सरकारी कामे पुढे सरकतील. घराची समस्या सोडवली जाईल.

तूळ
श्रेणीत वाढ संभवते. दूरची प्रवासाचा योग पुढे ढकलला जाऊ शकतो. घराचे काम निघेल. इतर कामात अधिक वेळ जाईल. मुलांच्या प्रगतीने मन सुखावेल.

वृश्चिक
काही विशेष करण्याच्या नादात वेळ खर्ची जाईल. वरिष्ठांशी चांगला संबंध निर्माण होईल. व्यावसायिक सौदा मनाजोगा होईल. कौटुंबिक संपत्तीत वाढ होईल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल.

धनू
अडकलेले पैसे मिळतील. अध्यात्मावरील विश्वास वाढेल. नवीन संकल्पामुळे कामांना गती मिळेल. निर्णय फायदेशीर ठरतील. एखादी भेट वस्तु मिळेल.

मकर
वरिष्ठांशी मतभेदाची शक्यता. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. जोडीदाराला वेळ दिल्याने नाते अधिक मजबूत होईल. हितशत्रू नरमाईची भूमिका घेतील. पाहुण्यांचे घरी आगमन होईल.

कुंभ
हातातील कामात यश येईल. वाहन विषयक काम पूर्ण होईल. नोकरदारांच्या अधिकारात वाढ होईल. घरगुती वापरासाठी वस्तु खरेदी कराल. नवे संकल्प कराल.

मीन
मुलांचे प्रश्न सोडवाल. आर्थिक बाबतीत वडीलांचे सहकारी लाभेल. हवामान बदलानुसार आरोग्याची काळजी घ्यावी. प्रेमिकांचा उत्साह वाढीस लागेल. मित्रांबरोबर वेळ घालवाल.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button