अकोल्यात लहामटेंना महायुतीचे वावडे!

मोदी ,शहा, फडणवीस ,यांचे फोटो प्रचार बॅनर मध्ये नाही,
अकोल्यात भाजप कार्यकर्त संतप्त
अकोले प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीमध्ये अकोल्यात महायुतीचे उमेदवार डॉक्टर किरण लहामटे असून ते आपल्या प्रचार यंत्रणेत महायुतीचे नरेंद्र मोदी,अमित शहा, देवेन्द्र फडणवीस यांचे फोटो बॅनर मध्ये वापरत नसल्याने भाजपचे कार्यकर्ते संतप्त झाले आहे
आमदारांनी प्रचार गाडीवर असलेले जुने फोटो काढून टाका त्या ठिकाणी पंतप्रधान व मुख्यमंत्री यांचे फोटो त्वरित लावा अन्यथा जुने पोस्टर फाडू भाजपचा इशारा
चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राधाकृष्ण विखे यांचे फोटो प्रचार गाडीच्या बॅनर वर लावावे असा इशारा त्यांनी दिला फोटो न लावल्यास जुने फोटो फाडून टाकू असा आक्रमक पवित्र त्यांनी व कार्यकर्त्यांनी या बैठकीत घेतला
विधानसभेची निवडणूक सुरू असल्याने अकोले तालुक्यात महायुती कडून अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे उमेदवार डॉक्टर किरण लहामटे हे उमेदवारी करीत आहेत मात्र महायुती असतानाही आमदार भाजपाच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नसल्याने भाजपच्या महायुती संदर्भातल्या बैठकीत अकोले भाजपा सह पठार भागातल्या अनेक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली
आम्ही भाजपाचे असून महायुतीचा निधी असताना विकास कामांमध्ये कधीच बोलावले नाही कुठेही महायुतीतील नेत्यांचे बॅनर वर फोटो टाकलेले नाही आमदार महोदय यांनी पठार भागात गाव गाव भेटी दिल्या मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नसल्याच्या तक्रारी पठार भागातील कार्यकर्त्यांनी तालुका बैठकीत केले 27 ते 28 गावात हिंदुत्वाला मानणारा मोठा मतदार येथे असल्याने पाहिजे असे संघटन पठार भागात झालेले नाही मात्र आमदारांनी पठार भागाच्या विकासासाठी भरपूर प्रयत्न केले आहेत मात्र आपण एकटे चालून मतदान घडणार नाही यासाठी सर्वांनाच विश्वासात घेणार का असा प्रश्न उपस्थित केला यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमदारांच्या बद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले मात्र ह्या मिटींगला आमदार का आले नाही असं आक्रमक पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला मात्र राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शरद चौधरी यांनी आमदार साहेब गाव भेटीत असल्याने उद्या तात्काळ त्यांच्या उपस्थितीत बैठक घडून आणण्याचे आश्वासन त्यांनी दिले

या बैठकीस भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सिताराम भांगरे सरचिटणीस मच्छिंद्र मंडलिक मोहन मुंडे, भाऊसाहेब वाकचौरे सुशांत वाकचौरे सचिन जोशी भाऊसाहेब आभाळे, सखाराम खतोडे युवा नेते संदीप यादव रोहिदास धुमाळ साहेबराव दातखिळे राम रुद्रे बाळासाहेब बनकर कैलास तळेकर शुभम खर्डे आदीं कार्यकर्ते महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या