इतर

सांगलीत विद्यार्थी दिन साजरा, स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांची भेट

डॉ. शाम जाधव

सांगली येथे आज दिनांक ७ ११/२०२४ रोजी ७ नोव्हेंबर १९०० हा ऐतिहहासिक दिवस विद्यार्थी दिन म्हणून सायंकाळी ७:३० वाजता विहारांमध्ये साजरा केला. त्यानिमित्ताने डॉक्टर घाडगे ह्या विहारात साठी यू.पी.एस.सी कॉम्पिटिटिव्ह परीक्षाची पुस्तके दान दिली.
सर्वप्रथम तथागत भगवान बुद्ध, विश्वरत्न विश्वभूषण सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाचे धूप दीप पुष्प यांनी पूजन करून त्रीसरण पंचशील ग्रहण करण्यात आले. सर्वप्रथम अध्यक्ष डॉक्टर सुधीर कोलप यांनी प्रास्ताविक भाषण करून उपस्थितितांचे स्वागत केले तसेच डॉक्टर संजीवनी घाडगे यांनी यापूर्वीही पुस्तकाचा संच मोठ्या प्रमाणात दिलेला आहे आणि आता सुद्धा त्या विहारासाठी सर्व तरुण विद्यार्थी विद्यार्थ्यांना एम पी एस सी या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पुस्तकाचा संच देत असल्याबाबत खूपच स्वागताची आणि स्वाभिमानाची बाब असल्याचे सांगितले त्यांचा आणि त्यांचे कन्या यांचा बुके देऊन सत्कार करण्यात आला.
विहाराचे संचालक सी.बी. चौधरी यांनी बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहार सांगली यांच्यातर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शालेय प्रवेश दिनानिमत सर्व उपस्थित पास-उपासिका भारतीय व सर्व विद्यार्थांना खुप खुप हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Education is milk of Loines and those person who Drank it rore as the Lion
“शिक्षण हे वाघिणीचे दूध असून जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.”
७ नोव्हेंबर १९०० ला रामजी बाबांनी लहानग्या भिवाचा प्रताप सिंह भोसले English High school मध्ये प्रवेश केला व भिवाचा शैक्षणिक प्रवास सुरू झाला, भिवाचे भिमराव आंबेडकर व भिमरावचे डॉ बाबासाहेब आंबेडकर झाले . त्यांच्या संघर्षमय व जिद्दी वृत्ती मुळे शैक्षणीक प्रगतीने पुढे विश्वरत्न बोधीसत्व प्रज्ञासूर्य व संविधान निर्माता झाले .

      विद्यार्थी दिवस हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने  ७ नोव्हेंबर हा दिवस 'विद्यार्थी दिवस' म्हणून राज्यभर साजरा करण्याचा निर्णय २७  ऑक्टोबर, २०१७ रोजी घेतला आहे. अतिउच्च दर्जाची विद्वता व ज्ञान असतानाही आंबेडकरांनी स्वतःला आजन्म विद्यार्थी मानले, आणि ते आदर्श विद्यार्थी ठरले. यामुळे शासनाने त्यांच्या शाळा प्रवेश दिनाला विद्यार्थी दिन म्हणून घोषित केले. 

प्रतापसिंह हायस्कूल (जुने नाव: गव्हर्नमेंट हायस्कूल) हे साताऱ्यातील जुन्या राजवाड्यात भरणारे विद्यालय आहे. सातारा जिल्ह्यातील ही पहिली शाळा इ.स. १८७४ मध्ये गव्हर्नमेंट हायस्कूल या नावाने सुरू झाली. त्यावेळी ही इंग्रजी माध्यमाची शाळा होती, आता मराठी माध्यमाची आहे.

विश्वव्यापी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या शाळेत प्रवेश घेतला होता. सोबतच त्यांचे मोठे बंधू आनंदराव रामजी आंबेडकर यांचा देखील प्रवेश झाला होता.
ही थोडक्यात माहिती अवगत करण्यात आली त्याचप्रमाणे आदरणीय माजी सचिव आयुष्यमान अशोक भटकर सर यांनी यापूर्वी डॉक्टर संजीवनी घाडगे यांनी बरेच पुस्तकाचे संच दिलेले असून ते कपाटात नोंदवही मध्ये यादीसह नमूद आहेत ते एकत्रित करून व्यवस्थित यादीसह ठेवण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार त्याप्रमाणे विहाराच्या सभागृहात आम्ही करून समोरच रिकामे असलेल्या कपाटात ठेवत असल्याचे सांगितले.
डॉक्टर संजीवनी घाडगे यांनी विहार हे चांगल्या प्रकारे कार्यरत असून शिक्षणासाठी विहार विद्यार्थ्यांचे केंद्र बनले पाहिजे आणि विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित राहून अभ्यासिका आणि सदरची पुस्तके त्यांना उपलब्ध करून यूपीएससी एमपीएससी ह्या केंद्रशासन महाराष्ट्र शासन मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेचा त्यांना लाभ होणे आवश्यक आहे तसेच माझी मुलगी सुद्धा विहारांमध्ये येऊन अभ्यासिकेचा लाभ घेईल, या बाबतच्या सूचना केल्या. धम्मपालन गाथा संपन्न होऊन कार्यक्रमाची सांगता झाली .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button