इतर

अकोले विधानसभा निवडणुकीत लहामटे दुसऱ्यांदा विजयी!

मंत्रिमंडळात डॉ किरण लहामटेना संधी मिळणार ?

अकोले प्रतिनिधी


216 अकोले विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस( शरदचंद्र पवार गट) या दोन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अतिशय अटीतटीची लढाई झाली

या लढाईत अजित पवार गटाचे विद्यमान आमदार डॉ. किरण लहामटे यांचा विजय झाला 5,802 मतांच्या फरकाने त्यांनी शरदचंद्र पवार गटाचे अमित भांगरे यांचा पराभव केला. भाजपचे वैभवराव पिचड यांनी बंडखोरी करून या निवडणुकीत अपक्ष उमेदवारी केली त्यांना या निवडणुकीत 32, 286 इतकी मते घेत ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अमित भांगरे हे पहिल्या फेरीपासून पुढे राहिले, यामुळे सकाळ पासून किरण लहामटे यांच्या समर्थकांत शांतता होती
मात्र अकराव्या फेरीत डॉ किरण लहामटे यांनी 534 मतांची आघाडी घेत विजयाकडे वाटचाल सुरू केली अकराव्या फेरीपासून डॉ. किरण लहामटे यांची विजयाकडे सुरू असलेली वाटचाल चालूच झाली बाराव्या फेरीत 1178 मतांची आघाडी घेतली, १३ व्या फेरीत 1928 मतांची आघाडी घेतली ,चौदाव्या फेरीत 2716 मतांची तर पंधराव्या फेरीत 3777 मतांची आघाडी घेत विजया कडे वाटचाल चालू ठेवली

अंतिम फेरीत मिळा लेले मतदान

पुढील प्रत्येक फेरीत त्यांनी आघाडी घेतली सोळाव्या फेरीत 3693 मतांची ,17 व्या फेरीत 3231 मतांची 18 फेरीत 3080 मतांची 19 व्या फेरीत 4293 मतांची, विसाव्या फेरीत 4763 मतांची ,21 व्या फेरीत 4525 मतांची आघाडी घेतली तर शेवटच्या 22 व्या फेरीत 5802 मतांनी महायुतीचे डॉ. लहामटे यांनी महाविकास आघाडीचे अमित भांगरे यांच्यावर विजय मिळविला अमित भांगरे यांना 67 हजार 188 एकूण मते मिळाली अमित भांगरे यांना 1214 टपा ली आणि गृहमतदान झाले तर तर विजयी डॉ. किरण लहामटे यांना 72 हजार 990 मते मिळाली टपाली आणि गृहमतदान यातील 968 मते डॉ ल हामटे यांना मिळाली लहामटे यांना एकूण73,958 मते मिळाली तर अमित भांगरे याना 68,402 मते मिळाली

5556 मतांच्या फरकाने डॉ किरण लहामटे हे विजयी झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी घोषित केले आहे

32 हजार286 मते मिळवत अपक्ष उमेदवार वैभव पिचड हे तिसऱ्या क्रमांकावर गेले तर शेवटपर्यंत विजयाचा दावा करणारे अपक्ष उमेदवार मधुकर तळपडे यांना अवघे 1707 मत मिळाले तर मारुती मेंगाळ यांना 10 हजार 740 मते मिळाली
इतर अपक्ष उमेदवार पांडुरंग पथवे यांना( 2782)
भिवा घाणे यांना( 435 )किसन पथवे यांना (386) विलास घोडे यांना (1455) मते मिळाली
या निवडणुकीत एकूण नऊ उमेदवार उभे होते या नऊपैकी एकही उमेदवार पसंत नाही अशा नोटा च्या बाजूने 2587 मतदारांनी मते टाकली

216 अकोले विधानसभा मतदारसंघात एकूण 2 लाख67हजार 510 मतदार आहे त्यापैकी 71. 98% टक्के म्हणजे 1लाख 92 हजार 556 मतदार मतदारांनी मतदान केले त्यात 1 लाख 2हजार 810 पुरुष तर 89 हजार 745 महिला मतदारांनी मतदान केले तर एका तृतीयपंथीयाने देखील आपला मतदानाचा हक्क बजावला आहे राज्य शासनाच्या लाडक्या बहीण योजने मुळे 89 हजार महिला मतदार मतदारांचे मतदान डॉ किरण लहामटे यांना निर्णायक ठरले आहे

अनेक नेते, कार्यकर्ते डॉ किरण लहामटे यांचे पासून बाजूला गेले तरीही डॉक्टर किरण लहामटे यांनी सहकार महर्षी सीताराम पाटील गाय कर यांना बरोबर घेत त्यांनी नेटाने खिंड लढवली त्यांच्या अकेला चलो असा नारा देत त्यांनी गाव न गाव पिंजून काढले त्यांच्या एकला चलो नाऱ्याची विरोध कांनी खिल्ली उडवली तरी त्यांनी विजयश्री खेचून आणली त्यांच्या विकास कामांचा आलेख , लाडक्या बहिणीं, जण सवांद यात्रा घाटन देवी चे महिलांना घडवून आणलेले देवदर्शन त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे त्यांना विजया कडे जाता आले उपमुख्यमंत्री अजित दादां पवार यांचे जवळचे सहकारी म्हणून ते परिचित असल्याने तसेच त्यांच्या कामाचा आलेख पाहता त्यांना राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री अथवा राज्यमंत्री दर्जाचे मंत्रीपद र्निश्चित मिळेल असा अशी चर्चा आता अकोल्यात सुरू आहे

उमेदवारांना मिळालेले टपाली मतदान पुढीलप्रमाणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button