आमदार लहामटेंना मंत्रिपद मिळावं यासाठी 15 कि.मी पायी जात कार्यकर्त्यांनी घातलं बाळेश्वराला साकडं !

सुनील गिते
अकोले दि 1 राज्याच्या मंत्रिमंडळात अकोल्याचे आमदार डॉ किरण लहामटे यांना मंत्रिपद मिळावे ते नामदार व्हावे यासाठी कार्यकर्त्यांनी सुमारे 15 किलोमीटर अंतर पायी चालत आज रविवारी श्री क्षेत्र बाळेश्वराला साकडे घातले
अकोल्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे हे विधानसभेवर दुसऱ्यांदा अकोल्यातून निवडून आले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ते आमदार असून अजित दादा पवार यांचे ते निकटचे सहकारी आहेत ते एक कार्यक्षम व कर्तबगार आमदार असल्याने त्यांनी अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकासाची कामे मार्गी लावली यावेळी ते पुन्हा निवडून आले आहे यामुळे त्यांना मंत्रिपदाची संधी मिळावी यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह सुरू आहे यातूनच लहित खुर्द येथील तरुणांनी त्यांच्या मंत्रिपदासाठी संकल्प सोडला सुमारे संगमनेर तालुक्यातील पठार भागात असणाऱ्या बाळेश्वर डोंगरावर 15 किलोमीटर पायी मजल दर मजल करत बाळेश्वरच्या डोंगरावर चढून जात आमदार किरण लहामटे यांना मंत्रिपद मिळावे असे साकडे घातले

यावेळी लहित खु गावचे सुमारे 60 ते 65 तरुण कार्यकर्ते उपस्थित होते सकाळी नऊ वाजता निघालेले हे कार्यकर्ते पायी प्रवास करत डोंगरकड्या कपारीतून डोंगराची चढण करत दुपारी दीड वाजता हे कार्यकर्ते बाळेश्वर डोंगरावर पोहोचले
आमदार डॉक्टर किरण लहामटे यांना मंत्रिपद मिळावे या साठी देवाला साकडे घातले याप्रसंगी लहित खुर्द येथील दिनकर तीटमे ,किशोर गोडसे
अनिल गोडसे ,किरण गोडसे ,मनेश कदम ,वैभव गोडसे
लक्ष्मण गोडसे, संजय गोडवे, संदिप गोडसे ,योगेश जाधव ,राम गोडसे ,संकेत हाडवळे,योगेश गोडसे
गोकुळ गोडसे ,सुरेश प्र.गोडसे ,सोहम गोडसे भास्कर पारधी आदी सुमारे 65 युवक कार्यकर्त्यांनी श्री क्षेत्र बाळेश्वराला साकडे घातले