अकोल्यात अपंगांना घरपट्टीत 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय कोतुळ ग्रामपंचायत ने सर्व प्रथम घेतला – राजू पाटील देशमुख

अकोले /प्रतिनिधी
अपंगांना घरपट्टीत 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय कोतुळ ग्रामपंचायत ने अकोले तालुक्यात सर्वप्रथम घेतला, अपंगांना प्राधान्याने घरकुल योजनेचा लाभ देऊ असे कोतूळ ग्रामपंचायतचे सदस्य व माजी उपसरपंच राजेंद्र पाटील देशमुख यांनी सांगितले

जागतिक अपंग दिनानिमित्ताने कोतुळ ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात कोतुळ येथे ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच भास्कर लोकरे हे होते तर यावेळी उपसरपंच संजय देशमुख सचिन मुतडक, मनोहर लेंडे आदी मान्यवर उपस्थित होते
अपंग देखील अनेक कौशल्य, कलागुणांमध्ये पुढे असतात त्यांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे अपंगांसाठी शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना असून त्याचा लाभ अपंगांनी घेतला पाहिजे असे श्री राजू पाटील म्हणाले

अपंग व्यक्ती शरीराने अपंग असते परंतु मनाने नसते त्यांच्यात एक ऊर्जा असते ती जागृत करा , आमदार डॉ किरण लहामटे हे आपल्या सोबत आहेत त्यांनी अपंगांना 5 टक्के निधी मिळवून दिला आहे अपंगांच्या कोणत्याही अडीअडचणी साठी मला सम्पर्क करा असे आवाहन भारतीय मीडिया फाउंडेशन चे सचिन मुतडक यांनी यावेळी केले
अपंगांच्या योजनेचा लाभ घेण्या साठी अपंग पुढे येत नाही ऑनलाईन अपंग प्रमानपत्र काढून घ्या 40 टक्के पेक्षा अधिक अपंग असणारे सरकारी योजनेस पात्र आहे
राजूर ग्रामपंचायत ने अपंगांच्या साठी असणारा 5 टक्के निधी अद्याप खर्च केला नसल्याची खंत मनोहर लेंडे यांनी व्यक्त केली
यावेळी अपंग संघटनेचे तालुका अध्यक्ष संजय डोंगरे, प्रा किशोर खरात , पत्रकार सुनील गिते, अमोल कोते यांनी मनोगत व्यक्त केले सरपंच भास्कर लोहकरे यांनी आभार मानले

यावेळी मुळा परिसर दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष भाउसाहेब साबळे ,कृष्णांवती- सातेवाडी परिसर दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष देवराम दिघे, कैलास तळेकर ,चित्रा साळवे ,भारती साळवे, अनिता चव्हाण ,महेश नेवासकर, ,सुमन मुठे सुनिल शेळके ,कैलास नेवासकर ,शेख कादर, कुशाबा पारधी ,हनुमंत कचरे ,कैलास पवार दादासाहेब गिते ,देवराम दिघे भीमराज भुजबळ सिताबाई पारधी , सोमनाथ बेंबळे ,विजय गिते कोंडीबा फुलसुंदर शिवनाथ वाकचौरे ,मनाली गोडे ,संजय देशमुख ,दावजी बारे ,कृष्णां वायळ, बाळासाहेब देशमुख. विकास देशमुख आदी उपस्थित होते