मोखडा जवळील कातकरी समाजाला दिली उबदार ब्लॅंकेटचे वाटप!

नाशिक प्रतिनिधी
डॉ. शाम जाधव
आदिवासी पाड्यातील लोकांचे थंडीपासून संरक्षण व्हावे यासाठी मोखाड्याजवळ असलेली एक छोटीशी वस्ती विकासवाडी म्हणून नामांकित आहे तेथे कातकरी समाजाचे शेतकरी कष्टकरी कामगार राहतात त्यांना उबदार निवारा मिळावा यासाठी श्री राधिका बहुउद्देशीय संस्था यांच्यावतीने डॉक्टर चेतनाताई सेवक संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनातून कोणत्याही मुलांना भेदभाव न करता उच्च शिक्षण द्यावे त्यांचे लग्न बाल वयात करू नये याविषयी गावकऱ्यांसोबत चर्चा केली

त्या मुलांसाठी आपली संस्था काहीतरी करीत आहे याची त्यांना जाणीव भासत असून त्यांना थंडीपासून निवारा यासाठी त्यांची सतत तळमळ चालू असते एकूण या गावातील १५० ब्लॅंकेट वाटप करण्यात आले त्या गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आनंदाचा गगनात व्हावी असा झाला जणू काही साक्षात ईश्वर आणि पाठवली देणगी असे म्हणणे वावगे ठरणार नाही श्री राधिका बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष डॉक्टर चेतना ताई सेवक यांचा एकच मानस आपल्या हातून काहीतरी चांगलं घडो हीच त्यांची सदैव तळमळ असते

त्यांच्यासोबत संस्थेचे पदाधिकारी हे पण जोमाने काम करत असतात तेथील पडसुल गावच्या पोलीस पाटील सौ कविता पाटील यांचेही सहकार्य लाभले निफाड शाखेचे पत्रकार संतोष आढाव व श्री राधिका बहुउद्देशीय संस्थेचे सदस्य श्री महेंद्र आहेर, श्री प्रकाश काळे, सौ रेखा काळे, सौ मीनल ओतारी, सौ आशाताई सोनवणे आदी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते श्री राधिका बहुउद्देशीय संस्थेचे एकच ध्येय मदतीचा आज सदैव पुढे असणारी एकमेव संस्था ईश्वर सेवा हीच श्रेष्ठ सेवा होय
