न्याहाळोद येथे गुरुदत्त यात्रोत्सवाचे आयोजन

संजय महाजन
न्याहाळोद (ता. जि. धुळे )येथे शनिवार दिनांक१४/१२/२०२४ रोजी श्री इच्छापूर्ती गुरुदत्त जयंती यात्रा महोत्सवाचे आयोजन मधुरबाई संतोष तानाजी रोकडे यांच्या शेतात करण्यात आले आहे.
दत्तात्रेय म्हणजे ब्रह्मा, विष्णू व महेश यांचा एकत्रित आविष्कार म्हणून उत्पत्ती, स्थिती व लय ही या तिन्ही देवतांची कार्य दत्तात्रेयांचा स्वरूपात समाविष्ट आहेत. अशाप्रकारे दत्त ही संपूर्ण विश्वाचे संतुलन राखणारी दिव्य ईश्वरी शक्ती आहे.तो संतुलनाचा अवतार आहे. गुरुतत्त्व हे अनादी आणि शाश्वत असल्यामुळे दत्तात्रेय हा उपदेशाने जगाचा उद्धार करीत चिरंजीव राहणारा अवतार आहे.’गुरु’ या शब्दातील ‘गु’ म्हणजे अज्ञान ‘रु’ म्हणजे नाहीसे करणे अर्थात जो अज्ञान नाहीसे करतो तो गुरु अशी सर्वमान्य परिभाषा आहे. गुरुतत्त्व हे साधकाचे अविद्यारूपी अज्ञान नाहीसे करून त्याला स्व स्वरूपाची ओळख करून देते.त्याचा उद्धार करते.पितांबराच्या पिवळा रंग हा ज्ञानाचा,सात्विक व निर्मळ बुद्धी यांचा दर्शक आहे.धेनू हे पृथ्वीचे प्रतीक आहे तर वेद हे श्वानरूपाने श्री गुरूंना अनुसरतात.
कार्यक्रमाचे रूपरेषा पुढील प्रमाणे राहील. शनिवार दिनांक १४/१२/२०२४ रोजी सकाळी ८ ते १० श्री गुरुदत्त महाराज यांच्या मूर्तीला रुद्राभिषेक.सकाळी ८ ते ११ माऊली महिला हरिपाठ मंडळ न्याहाळोद तर्फे हरिपाठ. सकाळी ११ ते ११.३० श्री दत्त महाराजांचा पालखी सोहळा.११.३० ते १२ श्री दत्त महाराजांचा जन्मोत्सव व महाआरती.१२ ते १२.३० सन्माननीय व्यक्तींचा सत्कार सोहळा १२.३० ते ३ महाप्रसाद (भंडारा) सायंकाळी ६ वा. आरती. रात्री ८ ते १० ह भ प नरेंद्र महाराज (माळी गुरुजी) धुळे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होईल. तरी आपण सहकुटुंब सहपरिवार ईष्टमित्रासह हे आनंद सोडत सहभागी व्हावे असे आवाहन ॲड.चुनीलाल रोकडे, आदिवासी विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मोतीलाल सोनवणे यांनी केले आहे.