इतर

शिर्डी त साई संस्थांन एम्प्लॉईज सोसायटीच्या विक्री स्टॉलचे डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

शिर्डी प्रतिनिधी :

(संजय महाजन)

श्री क्षेत्र शिर्डी येथे दर्शन रांगे जवळील पिंपळवाडी रोड लगत साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीच्या सुसज्ज व दर फलक लावलेले विविध विक्री स्टॉलचे उद्घाटन माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

यावेळी या साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार व सर्व संचालक, सभासद, पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

श्री क्षेत्र शिर्डी येथील साईबाबा मंदीरात गुरुवार १२ डिसेंबर २०२४ पासून हार, फुले आणि प्रसाद मंदिरात नेण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार परवानगी मिळाल्यानंतर साई मंदिरात हार प्रसाद देण्यास सुरुवात झाली आहे. माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी साई मंदिरात जाऊन साई समाधीवर पुष्पहार अर्पण केला. शिर्डी मध्ये साई मंदिरात हार फुल प्रसाद देण्यास परवानगी मिळाली आहे. मात्र हार फुल प्रसाद यांच्या किंमती योग्य असाव्यात यासाठी भावफलक लावण्याचे सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे शिर्डीी. मध्ये साई संस्थांनच्या एम्प्लॉईज सोसायटीच्या माध्यमातून प्रवेशद्वार एक जवळ पिंपळवाडी रोड लगत विक्री स्टॉल टाकण्यात आले आहेत. तसेच दर फलकही लावण्यात आले आहेत. गुरुवारी सकाळी या विक्री स्टॉल्सचे उद्घाटन मा.खा. डॉ

सुजय दादा विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. या विक्री स्टॉलवर डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी पूजन करून हार पुष्पगुच्छ विकत घेतले. व साई मंदिरात जाऊन ते साई समाधीवर अर्पण केले. कोरोना संकट कालावधी पासून शिर्डी साई मंदिरात हार फुले घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली होत साई भक्त व ग्रामस्थांची ते परत सुरू करावेत अशी मागणी पण न्यायालयात हे प्रकरण होते. परंतु आता माननीय उच्च न्यायालयाची परवानगी मिळाल्याने हार फुले प्रसाद मंदिरात यापुढे नेता येणार आहे. फुल उत्पादक शेतकरी, फुल विक्रेते व समस्त साई भक्तांना त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. येथे फुल शेती आता परत फुलणार आहे आर्थिक उलाढाल वाढणार आहे. त्यामुळे साईभक्त व ग्रामस्थांमधून आनंद समाधान व्यक्त होत आहे. असे डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सांगितले. तर श्री साईबाबा संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार यांनी यावेळी सांगितले की, आम्ही या संस्थेमार्फत येथे विक्री स्टॉल सुरू करत आहोत. येथे विक्री स्टॉलवर हार, प्रसाद यांचे योग्य असे दरफलक लावण्यात आले आहेत. साई भक्त हे आमचे दैवत असून त्यांना माफक व योग्य अशा दरात हार, प्रसाद मिळावा. अशी

आमची प्रामाणिक इच्छा असून संस्थेमार्फत तसाच प्रयत्न आम्ही करणार आहोत. या संस्थेच्या विक्री स्टॉलच्या माध्यमातून साई भक्तांची सेवा हीच साईबाबांची सेवा म्हणून आमची संस्था काम करत आहे व काम करत राहणार आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी युवा नेते माजी खासदार डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांचे साई संस्थान सोसायटीच्या वतीने चेअरमन विठ्ठल पवार यांनी त्यांचे स्वागत करत सत्कार केला. यावेळी या प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते ,मा उपनगराध्यक्ष अभय राजे शेळके, मा मनसे नगरसेवक दत्तात्रय कोते ,मा नगरसेवक अशोक गोंदकर ,मा नगरसेवक नितीन शेळके, मा उपनगराध्यक्ष गोपीनाथ बापू गोंदकर, ज्ञानेश्वर आबा गोंदकर व सोसायटीचे संचालक, सभासद, ग्रामस्थ, साई भक्त हेही उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button