इतर

रोटरी क्लब ऑफ नाशिक ,फ्रावशी इंटरॅक्ट क्लब कडून जनता वसतिगृह गिरनारे याचे नूतनीकरण

नाशिक दि17

सामाजिक ,शैक्षणिक,वैद्यकीय उपक्रम राबविण्यात रोटरी क्लब ऑफ नासिक नेहमीच आग्रेसर असते.

रोटरी क्लब ऑफ नाशिक,फ्रावशी इंटरॅक्ट क्लब कडून जनता हॉस्टेल गिरनारे ह्याचे नूतनीकरण उपक्रमाची रोटरी डिस्क्ट्रिक्ट गव्हर्नर राजिंदर खुराणा हायांच्या शुभहसते नारळ फोडून पारंपारीक पद्धतीने पूजा करुन शुभारंभ करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्तविक वसतिगृहाचे व्यवस्थापक नवनाथ थेटे ह्यानी केले.वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी भाकीतगीते,भजन सादर करुन आपल्यातील कालगुनांचा आविष्कर केला.
गिरनारे येथील जनता वसतिगृह येथे आवश्यक अशा विविध सुविधा ,दुरूस्ती,पेव्हर ब्लॉक ,फरशी बसविणे, विद्यार्थ्यांना गणवेश,गादी, टॉवेल,कपाटे, पत्रे बसविणे आदी कामे करण्यात येतील.
रोटरी च्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण व जीवन आनंददायी व्हावे हे उद्दीष्ट ठेवून हा उपक्रम हाती घेतल्याचे मनोगत ओमप्रकाश रावत ह्यानी व्यक्त केले.

जनता वसतिगृह गिरनारे येथे आवश्यक सुविधा ,सुधारणा करण्याची संधी रोटरी क्लब ऑफ नाशिक ,फ्रावशी इंटरॅक्ट क्लब हयाना मिळाली आहे.
वसतिगृहातील विद्यार्थी शैक्षणिक प्रगती करुन चांगले नागरिक बनून देशाच्या विकासात महत्त्वाचे योगदान देतीलअशी अपेक्षा डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजेन्दर खुराणा ह्यानी व्यक्त केली.
विशेष म्हणजे फ्रावशी इंटरॅक्ट क्लब च्या विद्यार्थ्यांनी रिना मल्होत्रा व इतर शिक्षकांच्या मार्गदर्शनाने उपक्रमासाठी आवश्यक निधी अल्कॉन इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचा सीएसआर फंड संचालिका सौ मेहता ह्यांच्या मदतीने मिळवला आहे.
रोटरी क्लब चे अध्यक्ष ओमप्रकाश रावत,सचिव प्रकल्प हेमराज राजपूत, सचिव प्रशासन शिल्पा पारख, विजय दिनानी,मकरंद चिंधडे, हृषीकेश समनवार,
दिलीपसिंह बेनिवाल ,निलेश सोनजे ह्यानी ह्या उपक्रमाची लवकरात लवकर पूर्तता करण्याचा संकल्प केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button