वर्धा येथे होणाऱ्या महिला राष्ट्रीय केसरी साठी प्रतिभा सारुकते हिची निवड!

नाशिक प्रतिनिधी
डॉ शाम जाधव
आज दिनांक १७/१२/२०२४ रोजी महिला महाराष्ट्र केसरी निवड करण्यात आली असून त्याची चाचणी स्वातंत्र्यवीर नरसिंग बलकवडे व्यायाम शाळा भगुर येथे घेण्यात आली आलेल्या महिला पैलवान( भरविरी ) येथील प्रतिभा सारुक्ते हिचा ५० किलो वजन गटात प्रथम क्रमांक तिची निवड करण्यात आली
वर्धा येथे होणाऱ्या महिला महाराष्ट्र केसरी साठी तिची निवड झाल्याबद्दल तिचे खुप खुप अभिनंदन भगूर शहर व भरवीर येथील गावकऱ्यांना मोठ्या उत्साही वातावरणात निवड करण्यात आली पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा भरवीर खुर्द येथे राहणारी प्रतिभा भास्कर सारुकते हिला महिला महाराष्ट्र केसरी साठी निवड झाल्याबद्दल तिचे अभिनंदन करण्यात येत आहे

आपल्या सारुक्ते खानदानात कुस्ती हा आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय.परंतु आतापर्यंत कुस्ती ह्या क्षेत्रात फक्त पुरुषांनी मैदाने गाजवली, सारुक्ते परिवारातील तु एकमेव आणि पहिली महिला कुस्तीगीर म्हणून आज अभिमानाने आम्ही बऱ्याच वेळा तुझ्या नावाचा उल्लेख करतो. बेटा तुला केसरी मिळावी म्हणून आमचे सतत तुझ्या डोक्यावर असतील. तुला कधीही काही अडचण आल्यास तु कधीही आम्हाला निःसंकोच सांग आम्ही सतत तुझ्या मदतीसाठी तत्पर आहॆ भरत खंडू सारुकते BRC मुंबई