इतर
लोक कलावंतांवर उपासमारीची वेळ;डीजेवर बंदी घालण्याची मागणी

जिल्ह्यात सुरु असलेल्या सांस्कृतिक कला केंद्रामध्ये डीजेचा वापर होत असल्याने लोक कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे डीजेवर बंदी घालावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोककलावंतांनी आंदोलन केले. याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
जिल्ह्यात हजारो लोक कलावंत
यावेळी लोकनाट्य सांस्कृतिक कलाकार संघटनेचे अध्यक्ष धोंडीराम जावळे, उपाध्यक्ष युवराज गायकवाड, प्रकाश काळे, माउली मोहरकर आदीसह लोककलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्ह्यात हजारो लोक कलावंत आहेत. सांस्कृतिक कला केंद्रामध्ये डीजे, तसेच टेप रेकॉर्डर या उपकरणाचा सरार्स वापर होत असल्याने ढोलकी, तबला, पेटी वादक लोक कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे, असे निवेदनात म्हटले आहे.