पारनेर तालुक्यातील कन्हैय्या परिवाराचा आधारवड हरपला !

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी
– हजारो हातांना रोजगार देणारे , शांत , संयमी , साधी राहणीमान असलेले दुग्ध व्यवसायातील दिग्गज , कन्हैय्या परिवाराचे प्रमुख , श्री मळगंगा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व श्री स्वामी समर्थ बँकेचे उपाध्यक्ष शांताराम मामा लंके यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी शनिवारी (दि . ४ )रोजी पहाटे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले . त्यांचा पार्थिवावर शनिवारी दुपारी निघोज येथेअंत्यसंस्कार करण्यात आले
दुग्ध व्यावसायिकांचे आधारवड असलेले शांताराम मामा लंके यांच्या निधनाने निघोज परिसरातील सर्व व्यावसायिक , दुग्ध उत्पादक शेतकरी , ग्रामस्थ यांना धक्का बसला आहे . त्यांच्या पश्चात पत्नी , मुलगा कन्हैया दुग्ध व्यवसायाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र शेठ लंके , सून , ४ विवाहीत मुली , जावई , नातवंडे , भाऊ महानगर बँकेच बँकेचे संचालक बबनशेठ , भावजयी, पुतणे असा मोठा परिवार आहे .
निघोज परिसराचा राज्यात नव्हे , देशात नावलौकिक व्हायला शांताराम मामा लंके व कन्हैय्या दुग्ध समुह आहे . दुध , दुग्धजन्य पदार्थ , दुध पावडर , शुद्ध पाणी बाटली , यामुळे कन्हैय्या हे नाव साता समुद्रापार गेले आहे . आज प्रति दिन लाखो लीटर दूध संकलीत करीत , हजारो दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी , हजारो कर्मचारी यांची रोजी रोटी बरोबरच त्यांच्या प्रगतीत कन्हैया परिवार व शांताराम मामा लंके यांचा सिंहाचा वाटा आहे ,.
, त्यांना प्रगतशिल शेतकरी म्हणून तालुक्यात ओळखले जात असे , त्याचबरोबर ते स्वतः दुध उत्पादक होते , त्यांचा म्हशींचा गोठा प्रसिद्ध होता , पाहण्यासाठी लांबून लांबून शेतकरी येत असे . निघोज परिसरात मोठया प्रमाणावर दुध उत्पादन होत असे , पण दुधाला कमी दर व विक्रीत सातत्य नसल्यामुळे दुध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाचा योग भाव , जाग्यावर खरेदी , खादय देण्याचा सर्वांत प्रथम उपक्रम शांताराम मामा लंके यांनी कन्हैय्या डेअरी या बॅनर ने सुरू केलेला उपक्रम , आज या व्यवसायाला विशाल स्वरूप आले आहे . त्यांनी व्यवसाया व्यतिरिक्त निघोज मधील गावगाड्या कडे ही लक्ष दिले . श्री स्वामी समर्थ बँकेचे उपाध्यक्ष उत्तम रितीने हाताळत , राज्यात प्रसिद्ध असलेल्या श्री मळगंगा मातेची सेवा करता करता देवस्थान ट्रस्ट मध्ये आता ते अध्यक्ष म्हणून कार्यरत होते.त्याचबरोबर ते धार्मिक , आध्यात्मिक , शैक्षणिक , कृषी , सामाजिक क्षेत्रात सातत्याने अखेरच्या श्वासापर्यंत कार्यरत राहिले.आज त्यांच्या अकाली जाणाने संपूर्ण निघोज परिसर स्तब्ध व पोरका झाला.त्यांच्या निघोज परिसरातील सर्व व्यावसायिकांनी आपापले व्यवसाय बंद ठेवून दुखवटा पाळला.