इतर

तिसरे युगस्त्री फातिमाबी शेख मुस्लिम मराठी साहित्य संमेलन लातूर येथे संपन्न होणार

कवयित्री मलेका शेख संमेलनाध्यक्ष तर कवी. इस्माईल शेख स्वागताध्यक्ष

लातूर दि ८

ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था महाराष्ट्र शाखा लातूर यांच्या मार्फत दिनांक १२ जानेवारी २०२५ रविवार रोजी लातूर येथे राज्यस्तरीय तिसरे फातिमाबी शेख मुस्लिम मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी नाशीक येथील सुप्रसिध्द साहित्यिक लेखिका मलेका महेबूब शेख – सय्यद यांची तर स्वागताध्यक्षपदी मुख्याध्यापक इस्माईल शेख यांची निवड करण्यात आली आहे. अशी माहिती संस्थेचे जिल्हाध्यक्ष तहेसीन सय्यद व केंद्रिय अध्यक्ष ॲड.हाशम पटेल यांनी दिली आहे.


भारतातील पहिल्या मुस्लिम मराठी शिक्षिका युगस्त्री फातिमाबी शेख यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या एकदिवसीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन माननिय आमदार तथा माजी वैदयकिय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख साहेब करणार असून खासदार डाॅ. शिवाजी काळगे साहेब, प्राचार्य नागोराव कुंभार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून मोईजभाई शेख,माजी महापौर विक्रांतजी गोजमगुंडे, ज्येष्ठ साहित्यिक फ. म. शहाजिंदे , ॲड.हाशम ईस्माईल पटेल , प्रा. मैनोद्दीन मुल्ला, संस्थापक कवी शेख शफी बोल्डेकर ,कवयित्री अनिसा सिकंदर शेख, कवी खाजाभाई बागवान , डाॅ. सय्यद जब्बार पटेल , अय्युब नल्लामंदू , डाॅ.इ.जा.तांबोळी , माजी संमेलनाध्यक्षा डाॅ. अर्जिनबी युसूफ शेख , इंतेखाब फराश , अफसर शेख ,डाँ.एहसानुल्ला कादरी ,प्रा.फारूख तांबोळी , मुहंमद युनूस पटेल , डाॅ. सुरैय्या जहागीरदार , डाॅ. दुष्यंत कटारे, विलास सिंदगीकर , डाॅ.महंमद रफी शेख , डाॅ. नंदकुमार माने , जाफरसाहाब शेख आदि मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

यावेळी पुस्तक प्रकाशन, पुरस्कार वितरण, परिसंवाद होणार आहे. परिसंवादाचा विषय ” वर्तमानातील मुस्लिम मराठी साहित्याची भूमिका ” हा असून या सत्राचे अध्यक्ष डाॅ. जयद्रथ जाधव आहेत. यात रामराजे आत्राम , नसीम जमादार , मुतवल्ली मैजोद्दीन एम.,नौशाद उस्मान हे प्रमुख वक्ते राहणार आहेत. ज्येष्ठ कवी बा ह. मगदूम पुणे यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवीसंमेलन आदि कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे.
हे साहित्य संमेलन भालचंद्र ब्लड बँक, गांधी मार्केट, लातूर येथे होणार आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने साहित्य प्रेमीनी उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामीण साहित्य संस्थेचे केंद्रीय अध्यक्ष ॲड. हाशम ई. पटेल, उपाध्यक्ष खाजाभाई बागवान , सचिव डाॅ. सय्यद जब्बार पटेल , संस्थापक तथा कोषाध्यक्ष शेख शफी बोल्डेकर ,सहसचिव प्राचार्य अनिसा सिकंदर शेख , कार्याध्यक्ष डाॅ. महंमद रफी शेख , सदस्य इस्माईल शेख ,जाफरसाहाब शेख , महासेन प्रधान , मुख्य संयोजक इस्माईल शेख,जिल्हाअध्यक्षा तहेसीन शेख यांनी केले आहे.या वेळी सकाळच्या सत्रात उद्घाटन कार्यक्रमात इंतेखाब फराश यांच्या सहकार्याने प्रकाशीत होणारी ” स्पंदन” स्मरणिका पुस्तकांचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होणार आहे तसेच स्व.ॲड.सिकंदर शेख यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा समाजसेवा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे तर युगस्त्री फातिमाबी शेख साहित्य पुरस्कार कवयित्री नूरजहाँ शेख आणि स्व. हुसेनसाब बागवान यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षक व लेखक गौसपाशा शेख यांना देण्यात येणार आहे.दुपारच्या सत्रात परिसंवाद व कवी संमेलन होईल.

कवी बा. ह. मगदूम यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कवी संमेलनात कवयित्री.रजिया जमादार, कवयित्री.नसीम जमादार, महेमूदा शेख, ॲड. उमाकांत आदमाने, कवयित्री सुमैय्या चौधरी, कवयित्री.सायराबानू चौघुले,कवयित्री सुरैय्या जहागीरदार सोबत राज्यातील जवळपास ५० कवी कवयित्री उपस्थित राहणार आहेत.एक दिवसीय फातीमांबी साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी स्वागताध्यक्ष इस्माईल शेख,लातूर जिल्हाच्या अध्यक्षा तहेसिन सय्यद ,कार्याध्यक्ष नदिम कादरी ,उपाध्यक्ष ॲड.एकबाल शेख,सचिव ॲड.सिमा पटेल,रमेश हनमंते,कासार रशिद,रसुल पठाण,कलिम शेख,अशफाख शेख,खालेद शेख,सत्तार शेख,मतिन अब्बासी,नजिर शेख हे प्रयत्नशील आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button