बचतगटां साठीची घाटघर येथे राष्ट्रीय परिषद संपन्न .

डॉ .डी . वाय .पाटील महाविद्यालयाचा उपक्रम
विलास तुपे
राजूर प्रतिनिधी
डॉ डी .वाय पाटील युनिटेक सोसायटीच्या, डॉ. डी वाय पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आकुर्डी व डॉ .डी . वाय पाटील कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पिंपरी ,वन्यजीव विभाग महाराष्ट्र शासन व बाएफ संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय ज्ञान प्रणाली आदिवासी संस्कृती महिला सक्षमीकरण : एक पाऊल शाश्वत विकासाकडे ही राष्ट्रीय परिषद नुकतीच घाटघर या ठिकाणी संपन्न झाली .
जंगलाच्या दऱ्याखोऱ्यात राहणारा ,जंगलाला आपल विश्व माणनारा आदिवासी समाज खऱ्या अर्थाने विकासाच्या प्रवाहात येणे ही काळाची गरज आहे . देश महासत्ता होत असताना आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी मांडण्यात आलेल्या १७ शाश्वत ध्येय्यांपैकी तर सर्वात पहिले ध्येय म्हणजे द्रारिद्रय दुर करणे . आदिवासी सक्षमीकरणासाठी पारंपारिक जतन केलेल्या ज्ञानाचा वापर झाला तर संपूर्ण कुटुंब सुधारू शकते आणि यासाठी आदिवासी समाजाकडे विविध प्रभावी साधने आहेत त्यांच्या वापरासाठी योग्य ती दिशा मिळाली पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेच्या माध्यमातून आदिवासी महिलांसाठी बाएफ या संस्थेच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते . यामधे आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या बीजमाता सौ . ममता भांगरे , बाएफ संस्थेचे योगेश नवले यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले

या प्रशिक्षणात रतनवाडी , साम्रद , घाटघर येथील 109 महिला तसेच विविध महाविद्यालयातील 61 प्राध्यापक सहभागी झाले होते
या परिषदेत मा . डॉ .संदीप देशमूख , मा . डॉ .अजय दरेकर , मा . डॉ . महेंद्र ख्याडे, डॉ . संगीता साळवे यांनी आदिवासी जीवनाशी संबंधित विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले .
सदर परिषदेच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक मा .डॉ . विलास आढाव , वनस्पतीशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमूख मा . डॉ . डी . आर . शिर्के , प्राचार्य डॉ शिवाजी ढगे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . मोहन वामन तसेच मा .डॉ . मानसी कृतकोटी हे उपस्थित होते .
सदर कार्यक्रमाचे आयोजन डॉ . डी . वाय . पाटील युनिटेक सोसायटीचे अध्यक्ष मा. डॉ. पी. डी. पाटील सर, उपाध्यक्ष मा. डाॕ. भाग्यश्रीताई पाटील, सचिव मा. डॉ. सोमनाथदादा पाटील, प्राचार्य मा डॉ मोहन वामन, मा प्राचार्य डॉ रणजीत पाटील तसेच आजीवन अध्ययन व विस्तार विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या मागदर्शनाखाली करण्यात आले.
कार्यक्रम आयोजनात कार्यक्रम सम्नवयक डॉ . मिनल भोसले , डॉ मानसी कृतकोटी , डॉ मुकेश तिवारी , यांनी सहभाग नोंदवला .