केंद्रीय उड्डाण नागरी राज्यमंत्री मोहोळ यांच्या हस्ते साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

शिर्डी प्रतिनिधी :
(संजय महाजन)
संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को. ऑप सोसायटीच्या नूतन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन केंद्रिय उड्डाण नागरी राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांच्या हस्ते शिर्डीत करण्यात आले. यावेळी सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार उपस्थित होते.
शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान कर्मचाऱ्यांची कामधेनु ठरलेल्या श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीच्या वतीने २०२५ या वर्षाच्या दिनदर्शिकचा प्रकाशन सोहळा साईबाबा संस्थानच्या सभागृहात उत्साहात पार पडला. याप्रसंगी सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी, राहता तालुका सहाय्यक निबंधक रावसाहेब खेडकर, वरिष्ठ लिपिक संजय पाटील, राजेंद्र सदाफळ, सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार, व्हा. चेअरमन पोपटराव कोते, संचालक महादू कांदळकर, कृष्णा आरणे, भाऊसाहेब कोकाटे, संभाजी तुरकणे, देविदास जगताप, विनोद कोते, मिलिंद दुनबळे, तुळशीराम पवार, रवींद्र गायकवाड, भाऊसाहेब लवांडे, इकबाल तांबोळी, गणेश आहिरे, सुनंदा जगताप, लता बारसे, रंभाजी गागरे, भाऊसाहेब लबडे, सचिव नबाजी डांगे, सहसचिव विलास वाणी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना अध्यक्ष विठ्ठल पवार यांनी मनोगत व्यक्त केले.