प्रजासत्ताक दिनी रुग्णांसाठी रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न

शिर्डी प्रतिनिधी-
शिर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच भारतरत्न डॉ एपीजे कलाम सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मेहमुद भाई सय्यद यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिसऱ्या रुग्णवाहिकेचे लोका र्पण दक्षिणेतील माजी खा डॉ सुजय विखे यांच्या हस्ते योजले होते. याप्रसंगी शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते,गोपीनाथ गोंदकर,निलेश कोते,दत्ता कोते आधी च्या प्रमुख उपस्थितीमध्ये या दिमागदार सोहळ्यात रुग्णवाहिकेचे लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
शिर्डीतील सामाजिक कार्यकर्ते मेहमुद भाई सय्यद हे सबका मालिक एक या साईबाबांच्या संदेशा प्रमाणे रुग्णांची सेवा करणारे सय्यद यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या संस्थे तर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबवले जात असतात. रुग्णांसाठी त्यांनी अत्यंत अल्प दरामध्ये रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे.या अगोदर त्यांनी दोन रुग्णवाहिका उपलब्ध करून दिले आहेत.
26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या व त्यांच्या वाढदिवसा निमित्ताने त्यांनी तिसरी रुग्णवाहिका रुग्णा साठी उपलब्ध करून दिली आहे. याप्रसंगी आलेल्या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या सोहळ्याप्रसंगी मेहमुद भाई सय्यद म्हणाले की पहिले रुग्णवाहिकेचे लोकार्पण सोहळा डॉ सुजय विखे यांच्या हस्ते पार पडला होता. मी रुग्णवाहिकेचे अल्प दरात रुग्णांसाठी उपलब्ध करून दिली आहे. बाबांनी सुद्धा अनेक रुग्णांची सेवा केली आहे. त्यांच्याच संदेश मी पुढे घेऊन जात आहे असे ते यावेळी बोलताना म्हणाले. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष दादाभाई इनामदार, हाजी शमशुद्दीन, अशरफभाई सय्यद, साजिदभाई शेख, मुक्तार भाई सय्यद, जावेद शाह,यूनुस सय्यद,जलील पठाण,अखलाख खान मज्जू अजगरअली, बरकत भाई सय्यद,पापा शेख, मतीन सय्यद, निसार शेख, इमरान सय्यद,सलीम तम्बूली, प्रसाद कोते व शिर्डीतील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.