विद्यार्थ्यांनीं छत्रपती चे विचार आत्मसात करावे- श्री बी एस भुसारी..

सोनई–प्रतिनिधी……
… न्यु इंग्लिश स्कुल मुळा कारखाना विद्यालयात शिव जयंती सोहळा उत्साहानं साजरा करण्यात आला. विद्यालयात सकाळी विद्यार्थ्यांनीं सडा -रांगोळी करुन तोरण बांधून भगवे ध्वज लावले होते.नंतर विद्यालयात भुसारी सरांचे शिव चरित्रावरती व्याख्यान झाले,आपल्या देशाला महासत्ता बनायचे आसल्यास विद्यार्थ्यांनीं छत्रपतींचे सघंटन,संस्कार, कौशल्य ,राष्ट्रांभिमान,निष्ठा व त्यागवृत्ती आत्मसात करावी. हे विचार छोट्या छोट्या गोष्टी सांगून विद्यार्थ्यांना म्ंत्रमुग्ध केले. कायॕक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री एस एम लोंढे होते.सुत्रसंचालन श्री पटारे सर यांनी केली .आभार प्रदर्शन श्री सावंत सर यांनी केले.
कायॕक्रमासाठी मा.श्री आप्पासाहेब शेटे ,रमेश पंडित,सादिक शेख ,राहुल शिंदे ,अमोल गडाख,शहादेव लोणार ,श्रीमती चोथे मिरा,श्रीमंती प्रतिभा ,अश्विनी गवळी,रमेश तुवर,गोविंद परदेशी.हे उपस्थित होते.