सुरेश खोसे पाटील यांची निवड ही पारनेर तालुक्याचे दृष्टीने भूषणाची बाब- उदयराव शेरकर.

दत्ता ठुबे
पारनेर – पारनेर तालुक्यातील पत्रकार सुरेश खोसे पाटील यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या राज्य कार्यकारिणीवर निवड होणे , ही तालुक्यातील पत्रकारांच्या दृष्टीने भुषनास्पद बाब असल्याचे प्रतिपादन पारनेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष उदयराव शेरकर यांनी व्यक्त केले आहे.
निघोज येथील पत्रकार संघ विभागीय कार्यालयाच्या वतीने तालुकाध्यक्ष शेरकर यांच्या अध्यक्षतेखाली व राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगे, राज्य मराठी चे जिल्हा उपाध्यक्ष विनोद गायकवाड, तालुकाध्यक्ष बाबाजी वाघमारे, उपाध्यक्ष भास्करराव कवाद, . अल्पसंख्याक समाजाचे नेते व माजी उपसरपंच उमेश सोनवणे , मनसेचे तालुका पदाधिकारी सतिष म्हस्के यांच्या हस्ते व विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून खोसे पाटील यांचा सत्कार करण्यात आला .

यावेळी पारनेर तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष दत्ताजी उनवणे, माजी उपाध्यक्ष संतोषशेठ ईधाटे, पदाधिकारी श्रीनिवास शिंदे , मार्गदर्शक अविनाश भांबरे , खजिनदार आनंदा भुकन , शहराध्यक्ष सागर आतकर , पारनेर तालुका पत्रकार संघाचे निघोज शहराध्यक्ष योगेश खाडे , राज्य पत्रकार संघाचे तालुका सहसचिव ॲड . सोमनाथराव गोपाळे , ज्येष्ठ मार्गदर्शक रामचंद्र सुपेकर ,निघोज शहराध्यक्ष सचिन जाधव , संदीप इधाटे ,संपतराव वैरागर , दिपकराव वरखडे , मार्गदर्शक सलीमभाई हावलदार , पारनेर तालुका पत्रकार संघाचे सदस्य व प्रसिद्ध प्रेस फोटोग्राफर जयसिंग हरेल , माजी उपसरपंच उमेश सोनवणे , आपला गणपती प्रतिष्ठान चे अध्यक्ष रवि रणसिंग , आणि पत्रकार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तालुकाध्यक्ष शेरकर यावेळी पुढे म्हणाले की , खोसे पाटील यांनी पत्रकारिता करताना समाजासाठी मोठ्या प्रमाणात योगदान दिले आहे. त्यांनी तसेच त्यांच्या सुविद्य पत्नी निलमताई खोसे पाटील यांनी समाजाच्या हिताच्या बातम्या प्रसिद्ध करुन तालुका विकासात मोठे योगदान दिले आहे. जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगे यांनी खोसे पाटील यांचे कौतुक करताना सांगितले की , राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून त्यांना जिल्हा सचिव होण्याची संधी मिळाली, त्या संधीचे सोने करीत त्यांनी जिल्ह्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडविले , म्हणून त्यांना मार्गदर्शक संजयजी भोकरे , प्रदेशाध्यक्ष गोविंदराव वाकळे , राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी राज्य कार्यकारिणीवर निवड करुन त्यांना सन्मानित केले आहे.
जिल्हा उपाध्यक्ष विनोद गायकवाड यावेळी म्हणाले की , खोसे पाटील पती पत्नी या दाम्पत्यांनी पत्रकारिता करताना मोठ्या प्रमाणात विकासत्मक कामे करण्यासाठी पाठबळ दिले . त्यांचा सन्मान हा जिल्ह्यातील प्रत्येक पत्रकाराचा सन्मान असल्याचे सांगितले.
तालुकाध्यक्ष बाबाजी वाघमारे यांनी सांगितले की , पाडळी दर्या सारख्या छोट्या गावाचा विकास करण्यासाठी खोसे पाटील यांनी गेली तीस वर्षात मोठ्या प्रमाणात योगदान दिले. त्यांची पत्रकारिता ही समाजासाठी प्रेरणादायी बाब असल्याचे सांगितले .
उपाध्यक्ष भास्करराव कवाद सर यांनी सांगितले की , निघोजच्या विकासासाठी खोसे पाटील पती पत्नी यांचे मोठे योगदान असून राज्य पत्रकार संघ यापुढे त्यांच्यावर मोठी जबाबदारी देणार असल्याची माहिती दिली.
सत्काराला उत्तर देताना राज्य पत्रकार संघाचे कार्यकारिणी सदस्य सुरेश खोसे पाटील यांनी सांगितले की , गेली चाळीस वर्षे या परिसरात ज्येष्ठ पत्रकार दत्ताजी उनवणे पत्रकारिता करतात , त्यांची व माझी मैत्री फार जुनी आहे. त्यांचे मला सातत्याने मार्गदर्शन मिळते , म्हणून राज्य पातळीवर काम करण्याची संधी मिळाली . पत्रकारिता करताना समन्वय फार महत्त्वाचा असून हाच समन्वय समाज विकासासाठी प्रेरणादायी ठरत आहे. पारनेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष उदयराव शेरकर व सर्व पदाधिकारी यांचे प्रेम , श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ आणि माता मळगंगा देवीचा आशिर्वाद सातत्याने मिळाला. सर्व पत्रकार मित्रांचे प्रेम व पाठबळ मिळाले, म्हणून हे सर्व काही मिळत असून या पदांच्या माध्यमातून राज्यातील व विशेष करुन अहिल्या नगर जिल्ह्यातील पत्रकारांचे प्रश्न शासनदरबारी मांडून त्यांचा सातत्याने पाठपुरावा करीत सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशिल राहणार असून निघोज विशेषतः पारनेर तालुक्यात ज्येष्ठ मार्गदर्शक दत्ताजी उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचाही आवर्जून उल्लेख करून ग्वाही त्यांनी दिली आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहराध्यक्ष योगेश खाडे, जयसिंग हरेल, सागर आतकर यांनी केले शेवटी दत्ताजी उनवणे यांनी आभार मानले.
यावेळी उपस्थित पत्रकार व ग्रामस्थ यांना निघोज येथील पत्रकार संघ विभागीय कार्यालय यांच्या वतीने मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट संचालित प्रसादालयात महाप्रसाद देऊन खोसे पाटील यांच्या निवडीच्या आनंद प्रित्यर्थ गोड जेवण देण्यात आले